शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

हातही न लावता ८४ पथदिवे होतात ‘आॅन-आॅफ’

By admin | Updated: December 31, 2015 02:22 IST

शहरासह जिल्ह्यात रात्री प्रकाश देण्यासाठी पथदिवे आहेत. हे पथदिवे रात्री सुरू व सकाळी बंद करण्यासाठी स्वतंत्र सजीव यंत्रणा आहे; ....

आधुनिक तंत्रज्ञान : नटाळा (पुनर्वसन) येथील पथदर्शी प्रकल्प ठरतोय वीज बचतीवर ‘रामबाण’पराग मगर वर्धाशहरासह जिल्ह्यात रात्री प्रकाश देण्यासाठी पथदिवे आहेत. हे पथदिवे रात्री सुरू व सकाळी बंद करण्यासाठी स्वतंत्र सजीव यंत्रणा आहे; पण हात न लावता सकाळी पथदिवे बंद व अंधार होताच ते सुरू झाले तर! सोबतच दिवे बंद व सुरू झाल्याचा संदेशही फोनवर आला तर! सर्वांना प्रश्न पडेल; पण ही किमया वर्धेतील उमेश कुबडे व पंकज दहीलकर या युवकांनी साकार करून दाखविली. तीदेखील नागरी सुविधांची वाणवा असलेल्या नटाळा (पुनर्वसन) सारख्या दुर्लक्षित गावात. आज हा पथदर्शी प्रकल्प कुठल्याही तांत्रिक अडचणींशिवाय सुरू असून जिल्ह्याला मार्गदर्शक ठरतोय.वीज बचत ही काळाची गरज आहे; पण ती वाचविण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, याचे उत्तर निराशाजनक असते. शहरात पथदिवे अनेकदा दिवसाही सुरूच असतात. यामुळे विजेचा अपव्यय होतो. अनेकदा बल्ब निकामी होतात. शहरात असे बल्ब लवकर बदलले जात असले तरी गावांत ही यंत्रणा इतकी मजबूत नाही. त्यातच पुनर्वसित गावांतील सुविधा तर विचारायला नको. यामुळे वीज वाचविण्यासाठी पथदिवेच स्वयंचलित केले तर, हा विचार पुनर्वसितांचे दु:ख झेललेल्या उमेश कुबडे या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकाच्या मनात घर करून होता. आपल्या ज्ञानाचा उपयोग एखाद्या पुनर्वसित गावासाठी व्हावा या हेतूने त्याने पंकज दहिलकर या सहकारी मित्राच्या सहकार्याने ‘सेंसरबेस आटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोलर विथ एसएमएस नोटिफिकेशन’ हा ‘ईलेक्ट्रॉनिक प्रोग्राम’ तयार केला. आधी तो घरीच राबविला. यानंतर नटाळा येथील नागरिकांना विश्वासात घेत पथदिव्यांवर बसविला. अनेक दिवस अध्ययन करून तो ग्रामस्थांना सुपूर्द केला. आज या प्रोग्रामद्वारे नटाळा येथील ८४ पथदिवे दररोज सकाळी आपोआप बंद होऊन सायंकाळी अंधार पडल्यावर आपोआप सुरू होतात. एवढेच नव्हे तर पथदिवे बंद व सुरू झाल्याचा संदेशही येथील रहिवासी प्रवीण चोरे या इसमाच्या मोबाईलवर झळकतो. काय आहे हा प्रोग्राम?प्रकाशाची ‘इंटिग्रिटी’ सेंसरच्या साह्याने मोजून त्या आधारावर हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकाशाचा ‘लॅक्स’ मोजून किमान १८० ‘लॅक्स’ प्रकाशमानावर पथदिवे बंद तर सायंकाळी २४० ‘लॅक्स’ प्रकाशमानावर पथदिवे सुरू होण्याच्या सूचना यात देण्यात आल्यात. शिवाय तांत्रिक अडचणी आल्यावरही या प्रणालीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी सोयही करण्यात आली आहे. अनेक अडचणींवर मातसर्वप्रथम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविताना याला कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उमेश आणि पंकज या दोघांनाही साशंकताच होती. तरीही तीन दिवसांच्या परिश्रमानंतर पंकजने हा संपूर्ण हार्डवेअर प्रोग्राम आणि सॉफ्ट्वेअर कोडिंग केली. सुरुवातीला लॅक्स रुममध्ये तपासल्यामुळे बाहेरच्या प्रकाशात नेल्यावर त्यातून भराभर संदेश मोबाईलवर जात होते. तसेच सिस्टमही हँग होत होती. या सर्वांवर मात करीत अखेर उमेशने नटाळा येथील प्रवीण चोरे यांना विश्वासात घेत येथील डीपीवर ही मशीन बसविली. आज पंधरवड्यापासून ८४ पथदिवे दररोज हातही न लावता बंद व सुरू होत आहे. यासाठी त्यांना आशिष लबडे व प्रतिक इंगळे यांचेही सहकार्य मिळाले. दोन हजार रुपयांत मशीन तयारही प्रोग्रामिंग मशीन तयार करण्यासाठी त्यांना अनेक छोटी-छोटी उपकरणे खरेदी करावी लागली. यामध्ये जीएसएम मॉडेल ७०० रुपये, मायक्रो कंट्रोलर ३०० रुपये, लाईट सेंसर १० रुपये, थ्री-फेज कंट्रोलर ९०० रुपये आणि पीसीबी २०० रुपये, असा एकूण २ हजार ११० रुपये खर्च आला.विजेची बचत या प्रोग्राममध्ये प्रकाशमानाचा लॅक्स अतिशय कमी ठेवण्यात आल्याने हे पथदिवे जेवढा प्रकाश कमी असतो तेवढेच अधिक उजळतात. त्यामुळे चंद्रप्रकाश असताना हे दिवे कमी प्रकाश फेकतात. परिणामी, विजेचीही बचत होण्यास मदत होते.