शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डोंगराळ भागातील गरमसूर येथे ७८ व्यक्तींनी घेतली व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

लसीकरण करताना नोंदणी करणे अनिवार्य असते आणि ही नोंदणी करताना सर्वांत मोठी अडचण निर्माण झाल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला मोबाइल कव्हरेज पाहण्यासाठी दीड कि.मी. अंतराचा परिसरात फिरावे लागले. अखेर गावापासून दीड कि.मी.  अंतरावर मोबाइल कव्हरेज मिळाल्याने गावातून नागरिकांना त्या स्थळावर नेऊन नोंदणी करणे व पुन्हा तेथून लसीकरणाकरिता गावात आणावे लागले.  यासाठी ग्रा.पं.ला वेळेवर वाहन व्यवस्था करावी लागली. या अगोदर गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देनोंदणी करण्यासाठी शोधली दीड किलोमीटर अंतरावर जागा

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : तालुक्यातील अखेरच्या टोकावरील व जंगलव्याप्त भाग असलेल्या गरमसूर येथे ७८ व्यक्तींनी  शनिवारी कोविडची लस घेतली. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर पण डोंगराळ भागात ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायती सहकार्याने आरोग्य विभागाने  लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले. मात्र, लसीकरण करताना नोंदणी करणे अनिवार्य असते आणि ही नोंदणी करताना सर्वांत मोठी अडचण निर्माण झाल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला मोबाइल कव्हरेज पाहण्यासाठी दीड कि.मी. अंतराचा परिसरात फिरावे लागले. अखेर गावापासून दीड कि.मी.  अंतरावर मोबाइल कव्हरेज मिळाल्याने गावातून नागरिकांना त्या स्थळावर नेऊन नोंदणी करणे व पुन्हा तेथून लसीकरणाकरिता गावात आणावे लागले.  यासाठी ग्रा.पं.ला वेळेवर वाहन व्यवस्था करावी लागली. या अगोदर गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना लस घेण्यासाठी तयार करण्यात आले. हे गाव सालई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते.  या गावाचा संपर्क वर्धा जिल्ह्याशी कमी आणि नागपूर जिल्ह्याशी अधिक येतो. मात्र, डोंगराळ भागातही लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये हा उद्देश ठेवून मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. त्यात ४५ ते ५९ या वयोगटातील ३५ व ६० प्लस मधील ४२, १ फ्रंटलाईन वर्कर यांचा लस घेणाऱ्यात समावेश आहे. मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाडीभस्मे, सरपंच अर्चना सलाम, ग्रामसेवक सुहास लंगडे, माजी उपसभापती उल्हास रणनवरे, तलाठी चन्नुरवार, आरोग्य सेवक रंगारी, प्राथमिक शाळेतील शिक्षक बारस्कर, पराते, पोलीस पाटील खंडाते आदी सहकार्य करीत आहेत.

दिव्यांग, वयोवृद्धांचे घरी जाऊन लसीकरण- दिव्यांग व वयोवृद्धा नागरिकांना त्यांचे घरी जाऊन त्यांना कोरोनाची लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग याबाबतीत सतर्क आहे.

मोबाइल कव्हरेजसाठी भटकंती- टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या गावात मोबाइल कव्हरेजचा सुकाळ आहे. पण गावात चमू पोहोचली अन् मोबाइल कव्हरेज नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा या कव्हरेजसाठी दीड किलोमीटर अंतराची भटकंती करण्याची वेळ आली. अखेर कव्हरेज मिळाले आणि नोंदणीचा करण्याचा मार्ग सुकर झाला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या