शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

७.६८ लाख रुग्णांनी घेतला अद्ययावत सेवेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:43 IST

समाजातील दुर्बल घटकांना अत्यल्प मोबदल्यात अद्यावत आरोग्य सेवा देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक नवनवीन मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातील नवीन मशीन ठरताहेत फायद्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजातील दुर्बल घटकांना अत्यल्प मोबदल्यात अद्यावत आरोग्य सेवा देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक नवनवीन मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गत तीन वर्षांत रुग्णालयातून ७.६८ लाख रुग्णांनी अद्यावत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर माता, समाजातील आर्थिक दुर्बल घटक आदींना नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाते. तर इतर नागरिकांना अतिशय अल्प मोबदला घेऊन आरोग्य सेवा पुरविली जाते. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गत वर्षी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय गरजुंना चांगली आरोग्य सेवा देण्यात द्वितीय क्रमांकावर राहिला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना शासनाच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी नव्या जोमाने यंदा प्रथम पुरस्कार पदरी पाडून घेण्यासाठी व जिल्ह्यातील प्रत्येक गरजुला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने लावण्यात आलेल्या आधुनिक मशीन्स या रुग्णांसाठी फायद्याच्या ठरत असून अजुन काही नवीन मशीन लावण्याची गरज आहे. सन २०१५-१६ मध्ये ३ लाख १५ हजार ४५, सन २०१६-१७ मध्ये ३ लाख ४४ हजार ७५१ व सन २०१७-१८ जुलै अखेरपर्यंत १ लाख ८ हजार ८९६ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेचा लाभ घेतला.अपुºया मनुष्यबळामुळे अनेक अडचणीजिल्हा सामान्य रुग्णालयात मंजूर विविध पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. अपुºया मनुष्य बळामुळे बहुदा एकाच अधिकारी व कर्मचाºयाच्या खांद्यावर विविध पदांची जबाबदारी येते. परिणामी, अधिकारी व कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग एकची १४ पदे, वर्ग दोनची पाच, वर्ग तीनची ५६ तर वर्ग चारची ३२ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. त्वरित ही पदे भरल्या गेल्यास याचा निश्चितच रुग्णांना फायदा होणार आहे.सात हजार महिलांची झाली प्रसुतीवर्धा शहरानजीक दोन मोठे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल असतानाही तीन वर्षात सात हजाराच्यावर महिलांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांवर विश्वास ठेऊन आपली प्रसुती येथे करून घेतली. सन २०१५-१६ मध्ये ३ हजार २३३, सन २०१६-१७ मध्ये २ हजार ९४८ व सन २०१७-१८ जुलै अखेरपर्यंत ८२९ महिलांनी प्रसुती करून घेतली.गर्भवतींना दिल्या जातो विविध योजनांचा लाभगर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्हा सामान्य रुग्णालयात दिला जातो. इतकेच नव्हे तर गर्भवती महिलेला घरुन दवाखान्यात आणण्यासाठी व दवाखान्यातून घरी नेण्यासाठी नि:शुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते.