शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

आंजी ग्रा.पं.करिता ७५ टक्के मतदान

By admin | Updated: April 18, 2016 04:27 IST

वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी), पवनूर व पुजई येथे पोटनिवडणूक होती. याकरिता रविवारी मतदान झाले. यात आंजी

आंजी (मोठी) : वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी), पवनूर व पुजई येथे पोटनिवडणूक होती. याकरिता रविवारी मतदान झाले. यात आंजी ग्रामपंचायतीत एका वॉर्डाकरिता ७५ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. येथे एकूण १,१६१ मतदानापैकी ८६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वॉर्ड क्रमांक १ मधील सुनील सावळे यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत सत्ताधारी गटाचे अशोक बोरसरे तर विरोधी गटाचे दीपक बावणकर याच्यात सरळ लढत झाली. असे असले तरी येथे सरपंच जगदीश संचेरीया विरूद्ध माजी सरपंच दीपक बावणकर अशी अप्रत्यक्ष लढत होती. यात दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला होती. मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रावर प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या एकाच्या मतदानावरून दोन्ही गटातील उमेदवारांच्या प्रतिनिधीमध्ये शाब्दीक चकमक झाली. निवडणूक अधिकाऱ्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद राऊत, जमादार दिनेश गायकवाड, शिपाई वैभव चरडे, घवघवे यांच्या मध्यस्थीने वाद निवळला. यामुळे पोलिसात कुठलीही तक्रार करण्यात आली नाही.(वार्ताहर) पवनूर येथे ६९.४२ टक्के मतदान ४पवनूर येथे केशव कडू यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत ६९.४२ टक्के मतदान झाले. यात ५०७ पैकी ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे सत्तापक्षाचे सुभाष कडू व लक्ष्मण कोंडलकर यांच्यात सरळ लढत आहे.पुजई येथे ७२.२२ टक्के मतदान ४पुजई ग्रा.पं.करिता ७२.२२ टक्के मतदान झाले. येथे २८८ पैकी २०८ नागरिकांनी मतदान केले. येथे शांततेत मतदान झाले.