शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 10:30 PM

तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या राजकारणात होता घोराडचा दबदबा : यावेळच्या निवडणुकीत तिहेरी सामना

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही निवडणूक विविध मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.२७ डिसेंबर १९४७ ला घोराड ग्रामपंचायत अस्तित्वात आली. शासन नियुक्त सरपंच म्हणून नारायण भिवाजी वाघे यांनी पदभार सांभाळला. सलग १३ वर्षे ते सरपंच होते. तर सर्वाधिक १४ वर्षे शंकर विठोबाजी खोपडे यांनी सरपंचपद भूषविले. १६ सरपंचात २००४ ते २०१९ या कालावधीत सलग तीन महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. तर आता चौथ्यांदाही महिलाकरिता सरपंचपद राखीव असल्याने घोराडच्या १७ व्या सरपंच कोण यासाठी मतदार २३ जूनला मतदान करणार आहे.शंकरराव खोपडे यांचा १९६६-१९७८ या कालावधीत सरपंच असताना तालुक्यात पहिली नळयोजना गावात आणण्यात सिंहाचा वाटा आहे. गावाच्या विकासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अधिकाअधिक काळ गावावर खोपडे गटाचा वरचष्मा राहिला आहे.१९६१ ते १९७८ सलग १७ वर्षांची सत्ता १९७८ ला खोपडे गटाच्या हातून विरोधकांनी हिसकावून घेतली व अशोक केशवराव तेलरांधे हे सरपंच झाले. मात्र, पुन्हा ५ वर्षांतच १९८४ ला मतदारांनी खोपडे गटाच्या हातात सत्ता दिली. तर १९८९ ला झालेल्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना कौल देत देवराव नथ्थुजी राऊत (पाटील) गटाची सत्ता आली. पण, सरपंच पदासाठी दुफळी निर्माण झाल्याने खोपडे गटाने सहकार्याचा हात देत विरोधी गटातील ४ सदस्य आपल्याकडे आणत बाबाराव सुरकार यांची सरपंचपदी निवड केली. येथूनच घोराडचे राजकारण बदलले. १९९४ ते ९९ मध्ये खोपडे गटाचे दोन गट झाले आणि वसंतराव तेलरांधे सरपंच झाले. १९९९ मधील निवडणुकीत गोपाळराव माहुरे सरपंचपदी निवडून आले व २००४ पर्यंत पुन्हा खोपडे गटाची सत्ता राहिली. २००४-०९ जयस्वाल गटाकडे, २००९ ते २०१४ मध्ये जयस्वाल गटाचा पराभव करीत गावातील सर्वपक्षीय गटाची सत्ता आली.२०१४ पासून रणनवरे गटाची सत्ता आहे. तर २०१९ मध्ये सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी पाहता रणनवरे, जयस्वाल व आमदार गट असा तिहेरी सामना होत असल्याने मतदार कोणत्या गटाला झुकते माप देतात, हे २३ जूनला होणाऱ्या मतदारानंतरच कळणार आहे.सरपंचपदाची हॅट्ट्रिकनारायणराव वाघे, दादाजी ढोले, श्यामराव बालपांडे, शंकरराव खोपडे, अशोक तेलरांधे, बाबाराव सुरकार, देवराव राऊत, रमेश राऊत, वसंत तेलरांधे, गोपाळ माहुरे, तारा तेलरांधे, मंदा तडस, ज्योती घंगारे, यात शंकरराव खोपडे तीनवेळा तर दादाजी ढोले यांनी दोनवेळा सरपंचपद भूषविले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत