शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

७२ हजार विद्यार्थ्यांनी दिली ग्रामगीता परीक्षा

By admin | Updated: January 5, 2015 23:10 IST

अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आश्रमाद्वारे संपूर्ण देशात रविवारी ग्रामगीता परीक्षा घेण्यात आली़ यात ७२ हजार विद्यार्थी सहभागी झाले. स्थानिक ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात

साहुर : अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आश्रमाद्वारे संपूर्ण देशात रविवारी ग्रामगीता परीक्षा घेण्यात आली़ यात ७२ हजार विद्यार्थी सहभागी झाले. स्थानिक ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूदेव कार्याला वाहून घेतलेले केशव रामटेके यांनी २६ जानेवारी १९९० रोजी सर्वप्रथम ९०१ विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेला बसविले होते. २६ वर्षांच्या वाटचालीत विद्यार्थ्यांची संख्या ७२ हजारांवर पोहोचली आहे. या परीक्षेचे एकूण सहा टप्पे आहे़ प्रवेश, परिचय, प्रवीण, ग्रामनाथ, ग्रामगीतारत्न व ग्रामगीताचार्य अशी परीक्षांची नावे आहेत. रामकृष्णदादा बेलूरकर यांनी ही परीक्षा दिली नसली तरी त्यांचा अभ्यास व मुखोग्दत ग्रामगीता बघून संपूर्ण राज्यात त्यांना ग्रामगीताचार्य म्हणून संबोधले जाते. ग्रामगीताचार्य ही परीक्षा पीएचडी समकक्ष म्हणूनच गुरूदेव परिवारात ओळखली जाते. आजपर्यंत ८ लाख ७९ हजार ८९० गुरूदेव सेवकांनी या परीक्षा दिल्या़ यात १४७ प्रचारक ग्रामगीताचार्य झाले असून त्यातील ९ जणांचा सेवाकार्यात मृत्यू झाला़ इतर ग्रामगीताचार्य गावोगावी जाऊन प्रबोधन करतात़ ग्रामगीताचार्य गुलाब खवसे हे सचिव झाल्यावर विशेष सुधारणा करण्यात आल्या़ परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सेवकांना सन्मानपत्र, ग्रामगीताचार्यांना विशेष पुरस्कार, स्मृतिचिन्ह शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले जाते़ येथील परीक्षेला प्रा. विनोद पेठे, दीपक खरडे, हरि टाकळकर, विजय तळहांडे, शरद वरकड, रमेशचंद्र सरोदे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)