शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

७,१८६ लाभार्थ्यांना मिळणार ‘सौभाग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:49 IST

अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. वर्धेत या योजनेचा लाभ एकूण ७ हजार १६८ लाभार्थ्यांना होणार आहे. यात ४,७६८ एपीएल आणि २ हजार ३८८ लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी देण्याकरिता पंतप्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत दारिद्रय रेषेखाली असलेल्या घराला मोफत जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे अंधारात राहणाऱ्या या घरात आता उजेड दिसण्याची शक्यता आहे.दारिद्र्य रेषेखाली असलेल्या घरांना दीड पॉइंटची वीज फिटींग आणि एक बल्ब मोफत देण्यात येणार आहे. यात त्यांच्याकडून कुठलेही शुल्क आकरण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर एपीएल यादीत असलेल्या लाभार्थ्यांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकमुस्त नाही तर प्रत्येक देयकात लागून येणार असल्याने त्यांना विशेष ताण बसणार नसल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.योजनेचा लाभ घेण्याकरिता संबधितांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय या योजनेचा लाभ नागरिकांना व्हावा याकरिता महावितरणच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेत अंधाऱ्या घरात उजेड करण्याचे आवाहन आहे.केरोसीन बचतीवर भरग्रामीण भागात घरात दिवा जाळण्याकरिता केरोसीन आवश्यक आहे. यामुळे केरोसीनचा काळाबाजार होत असल्याने त्यावर आळा घालणेही यातून शक्य होणार आहे. यामुळे शासनाने ही योजना राबविण्याकडे विशेष लक्ष पुरविले असल्याचे दिसत आहे.२८ गावांत लागणार कॅम्पडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ सर्व गरजवंतांना मिळावा याकरिता जिल्ह्यात तब्बल २८ गावांत कॅम्प लागणार आहे. या कॅम्पात सहभागी होवून नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आहे. ही योजना ५ मे २०१८ पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.एपीएल धारकांना देयकात ५० रुपये अतिरिक्तयोजनेचा लाभ दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना मोफत आहे तर एपीएल धारकांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकवेळ नाही तर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा आहे. वीज जोडणी झाल्यानंतर येणाºया प्रत्येक देयकात या रकमेपोटी ५० रुपये वाढीव येणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीज