शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

७,१८३ चिमुकल्यांसह विद्यार्थ्यांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:44 IST

कुठल्याही आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या आरोग्य सूविधांपासून वंचित राहू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडींमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयाचा उपक्रम : अंगणवाडींसह शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुठल्याही आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या आरोग्य सूविधांपासून वंचित राहू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडींमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्त्वात राबविला जात आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ८७६ अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून आतापर्यंत या उपक्रमाचा ७ हजार १८३ विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आहे. त्यापैकी काहींना आवश्यक साहित्यही वितरित करण्यात आले आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत १३ ते १४ वर्ष वयोगटापासून ० ते १८ वयोगटातील बालकांच्या आरोग्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. या पथकामार्फत शाळा व अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये जि.प. व अनुदानीत शाळांचा समावेश आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून एकदा तर अंगणवाडीतील चिमुकल्याची आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा करण्यात येते. आरोग्य तपासणीदरम्यान प्रामुख्याने ४ डिएसचा, जन्मत: दिव्यांग, विकासात्मक वाढीचे विलंब, आजार, जीवनसत्व कमतरता आदींची चाचपडताळणी केली जाते. आजारी असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य विषयक विशेष सेवा दिली जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार १८४ विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील चिमुकल्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला आहे. उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक मडावी यांनी केले आहे.आरोग्य तपासणीसाठी १७ पथकजिल्ह्यातील अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एकूण १७ चमू करण्यात आले. यात वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (स्त्री) यांच्यासह परिचारिकेचा समावेश आहे.२.२७ लाख लाभार्थीजिल्ह्यातील २ हजार ८७६ अंगणवाडीसह शाळांमधील एकूण २ लाख २७ हजार ६०० विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा मानस या उपक्रमाच्या माध्यमातून होता. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासण करून १८ विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया, ६७ जणांच्या इतर शस्त्रक्रिया, ५ हजार ९११ जणांची नेत्र रोग तपासणी, ७२९ नेत्र रुग्णांवर उपचार, ३० गरजुंना चष्मे वाटप, सहा कर्णबधीरांना मशीन वाटप तर ४२२ गरजु विद्यार्थ्यांना दंत उपचाराचा लाभ देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व सेवा नि:शुल्क देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी