शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

६८ टक्के घरे आहेत शौचालयाविना

By admin | Updated: November 9, 2014 23:16 IST

जिल्ह्यातील ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचालयात जाण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे.

वायगाव (निपाणी) : जिल्ह्यातील ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचालयात जाण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे. अशा परिस्थितीत संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. ही स्थिती प्रगतीशील महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ९५ हजार आठ हजार एवढे आहे. मात्र त्यात २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात केवळ १४ हजार ६५१ शौचालय बांधण्यात आले आणि सन २०१४-१५ मध्ये आतापर्यंत १५ हजार ३६३ शौचालय बांधण्यात आले. जिल्ह्यात ६५ हजार ०७ घरं शौचालयाविनाच आहे. यात अजूनही जिल्ह्यात ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात ५१७ ग्रामपंचायती आहेत. त्यात २ लाख १० हजार २६३ घरे आहेत. यापैकी जिल्हा परिषद वर्धा यांना ९५ हजार ८ घरात शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य होते. असे असताना केवळ ३० हजार १४ घरात शौचालय बांधण्यात आले. कारंजा तालुक्यात संख्यात्मक दृष्ट्या सर्वाधिक शौचालय आहे. यात उद्दिष्ट आठ हजार ३६१ असून त्यात पाच हजार ८७७ शौचालयाची निर्मिती केली. त्यात फक्त दोन हजार ४८४ बाकी आहे. सर्वात कमी शौचालय हे आष्टी तालुक्यात असून येथे सात हजार १०४ शौचालयाचे उदिष्ट असून १ हजार ७३० शौचालयांची निर्मिती झाली आहे. यात पाच हजार ३७४ घरं शौचालय विना आहेत. वर्धा तालुक्यात ठरविलेले उद्दिष्टे १५ हजार ९७८ असून सन १३-१४ मध्ये १ हजार ७३६ तर सन १४-१५ मध्ये २ हजार ५७१ म्हणजे चार हजार ३०७ शौचालय निर्मिती केली. तालुक्यातील ११ हजार ६७१ घरे शौचालयाविनाच आहे. समुद्रपूर तालुक्यामध्ये १३ हजार ८८७ उद्दिष्ट असून तीन हजार ७४९ शौचालय निर्मिती केली. येथील १० हजार १३८ घरे अजूनही शौचालयाविनाच आहे. आर्वी तालुक्यातील १२ हजार ३२७ उद्दीष्ट असून २ हजार ५५६ शौचालय निर्मिती केली. त्यात ९ हजार ७७१ घरे शौचालयविनाच आहे. देवळी तालुक्यातील १२ हजार १७ उद्दिष्ट असून तीन हजार ५२४ शौचालयानिर्मिती केली असून आठ हजार ४९३ घरे शौचालय विनाच आहे. हिंगणघाट तालुक्यात १३ हजार ९५७ शौचालयाचे उद्दीष्ट असून चार हजार ६६१ शौचालयाची निर्मिती करण्यात आली असून ९ हजार १९६ घरे शौचालयाविनाच आहे. सेलू तालुक्यात ११ हजार ४८७ शौचालय बनविण्याचे उद्दिष्ट असताना केवळ तीन हजार ६०७ शौचालय बांधण्यात आले आहे. त्यात ७ हजार ८८० घरे अजूनही शौचालयाविनाच आहे. (वार्ताहर)