शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पवनार येथे ६५ मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:54 IST

येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देविषबाधेचा संशय : मेंढपाळाचे २.६० लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली.खरीप हंगामात खाली झालेल्या कपाशीच्या शेतात मेंढपाळ आपला मुक्काम करतात. आज या शेतात तर उद्या त्या शेतात असा त्यांचा प्रवास असतो. घटनेच्या दिवशी मेंढपाळाने आपला बेढा बाबाराव सोनटक्के यांच्या शेतात टाकला. एक दिवस कपाशीचे दोन चराई करून दुसरे दिवशी दुपारी नदीवर पाणी पाजून आणल्यानंतर मेंढ्यांना जागी बांधून ठेवण्यात आले. करणकडे एकूण ६०० मेंढ्या आहेत यापैकी ५२ मेंढ्या सोमवारच्या रात्री अचानक मृतावस्थेत दिसून आल्या.सध्या कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप आहे. या प्रकोपातून बचावाकरिता शेतकºयांनी विविध घातक विषारी औषधांची फवारणी केली आहे. यामुळे मेंढ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असून कपाशी खाल्याने झाली नाही, हे स्पष्ट होते. मेंढीधारकाला विम्याबाबत विचारणा केली असता विमा नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला विम्याचीही भरपाई मिळणार नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनवीज यांना याबाबत माहिती दिली असून शवविच्छेदनकरिता चमूला पाचारण करणार असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक प्रशांत भोयर यांनाही या प्रकाराची सूचना करण्यात आली आहे. त्यांनी सुध्दा घटनास्थळाला भेट देवून वरिष्ठांना माहिती देत असल्याचे सांगितले.वेळीच सावधानता बाळगणे गरजेचेपवनार येथे करण रब्बारी नामक मेंढपाळाच्या मेंढ्या दगावल्या. यात त्याने मोठे नुकसान झाले. त्याचे हे नुकसान भरून निघणे कठीण आहे. त्याच्या मेंढ्या विषबाधाने दगावल्या असे बोलले जात आहे. असे असेल तर ठीक. मात्र जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या बोंडअळीच्या प्रकोपाणे जर या मेंढ्या दगावल्या असतील तर शेतकºयांकरिता ही धोक्याची घंटा आहे. कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त बोंड बैलांना वा जनावरांना खायला दिल्यास यात विषबाधा होवून जनावरांचा मृत्यू उद्भवण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.