शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

६.४५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

By admin | Updated: January 31, 2015 01:56 IST

सुगंधित तंबाखू विकत असल्याच्या माहितीवरून दारूबंदी विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांसह अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी कारवाई केली.

देवळी : सुगंधित तंबाखू विकत असल्याच्या माहितीवरून दारूबंदी विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांसह अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी कारवाई केली. यात येथील तीन दुकानांतून ६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य एका दुकानाचा मालक पोलीस कारवाईच्या भीतीने फरार झाल्याचे म्हणत त्याच्या दुकानाला सील लावण्यात आले; पण शुक्रवारी सकाळी त्याच्या दुकानाला लावलेले सिल काढून तपासणी केली असता त्याच्या घरात काहीही सापडले नाही. पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरात गुरूवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. रात्री तीन दुकानांमध्ये कारवाई करण्यात आली तर एक दुकानदार बाहेरगावी गेला असताना तो फरार असल्याचे दाखविण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सतीश नंदनवार यांच्या मालकीच्या दुकानामध्ये ३ लाख १५ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू मिळून आला तर राजेंद्र सावरकरच्या दुकानात २ लाख २५ हजार रुपये तसेच सुरेश पटेल याच्या दुकानातून १ लाख ५ हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला. सील केलेल्या दुकानाची आज सकाळी सिल काढून तपासणी केली असता त्यात काहीही सापडले नाही. मादक वस्तूंची साठवणूक तसेच वितरण करण्यावर शासनाची बंदी घातली असता देवळी येथे या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत होती. हा प्रकार खुलेआम सुरू असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)