शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील ७६२ पीडितांना ६.१३ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित

By महेश सायखेडे | Updated: September 5, 2022 18:39 IST

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते.

वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये अनुसूचित जाती व जमातीच्या पीडित व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात ७६२ पीडित व्यक्तींना तब्बल सहा कोटी तेरा लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी व या जाती-जमातीतील पीडित व्यक्तींना अर्थसाहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीसमोर वेळोवेळी सादर झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रकरणनिहाय पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर करण्यात येते. या कायद्यांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस तपासानंतर अधिनियमान्वये पात्र ठरलेल्या पीडित व्यक्तीस अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. अर्थसाहाय्य मंजूर होणाऱ्या प्रकरणांमध्ये शिवीगाळ, गंभीर दुखापत, विनयभंग, बलात्कार, हत्येचा प्रयत्न व हत्या झाल्यास संबंधित पीडित व्यक्तीस किंवा कुटुंबीयांस १ लाख ते ८ लाख २५ हजारांपर्यंत अर्थसाहाय्य मंजूर केले जाते. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर टप्याटप्याने मदतीची रक्कम वितरित करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत ७६२ पीडित व्यक्तींना ६ कोटी १३ लाखांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पीडित व्यक्तींना वेळीच अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनीच काम करावे. जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रांअभावी अर्थसाहाय्य प्रलंबित राहू नये. कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विशेष पाठपुरावा करून ही प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी पुढील बैठकीत सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाचारण करण्यात येणार आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा