शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा न.प.चा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:17 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या (नागरी) धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देखासदारांची माहिती : नगर विकास विभागाचे आदेश जारी

आॅनलाईन लोकमतवर्धा : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या (नागरी) धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील देवळी, पुलगाव, हिंगणघाट, वर्धा, सिंदी (रेल्वे) आणि आर्वी या सहा नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगर विकास विभागाने मंजुरी प्रदान केली आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत वर्धा नगर पालिकेला ४ कोटी ४० लाख रुपये, आर्वीला २ कोटी २८ लाख रुपये, सिंदी (रेल्वे) नगर परिषदेला १ कोटी ३५ लाख रुपये, पुलगाव पालिकेला २ कोटी ५० लाख रुपये, हिंगणघाट ४ कोटी ६३ लाख तर देवळी नगर परिषदेकरिता १ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या रकमेतून घनकचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली असून त्यानंतर भारतातील नामवंत निरी या संस्थेने प्रकल्पाचे मुल्यांकन केले आहे. त्यानुसार मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने सर्व प्रकल्पांना अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या उदात्त हेतूने केंद्र आणि राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. त्याचा परिणाम म्हणून केंद्र व राज्य शासनाने एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने शहरातील कचºयाची विल्हेवाट लावताना येणाºया अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. शिवाय शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याने पालिका प्रशासनालाही कचºयाचा विषय गांभीर्याने घेऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य मिळेल.नियोजनाअभावी पूर्वीच्या प्रकल्पांचा बोजवाराराज्यात यापूर्वीही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्या. अनेक ठिकाणी हे प्रकल्प हाती घेण्यात आले; पण यात कुठलेही नियोजन नव्हते. परिणामी, त्या प्रकल्पांची वासलात लागल्याचेच दिसून येते. हे चित्र फार दूर नव्हे तर जिल्ह्यातच सर्वत्र दिसून येते. वर्धा, पुलगाव, हिंगणघाट आदी नगर परिषदांद्वारे डम्पिंग ग्राऊंड ही संकल्पना राबविण्यात आली. यातून खत निर्मितीच्या बाता करण्यात आल्या; पण कुठेही यावर अंमल झाल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदांना पूरेसा निधीही पुरविला गेला नाही. यामुळे नगर परिषदांना शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता केंद्र व राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरीसह निधीही उपलब्ध करून दिल्याने चर्चेतील बाबी सत्यात उतरणार आहेत. यामुळे शहरेही स्वच्छ होतील.