शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भोसकून ५.६० लाख लुटले लुटारु स्कार्फ बांधून आले

By admin | Updated: May 9, 2014 01:49 IST

येथील भारतीय स्टेट बैंक शाखेतून ५ लाख ६० हजारांची रोकड काढून पुलगावला जात असताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधून असलेल्या दोन अनोळखी इसमांनी चाकू हल्ला चढवून रक्कम लुटली.

सोरटा-विरूळ मार्गावरील थरार

वर्धा : विरूळ(आ.) येथील भारतीय स्टेट बैंक शाखेतून ५ लाख ६० हजारांची रोकड काढून पुलगावला जात असताना चेहर्‍यावर स्कार्फ बांधून असलेल्या दोन अनोळखी इसमांनी चाकू हल्ला चढवून रक्कम लुटली. हा थरार गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडला. चाकू हल्ल्यात हेमंत उर्फ गोलु देविदास जिचकार (४२) याच्या पायाला इजा झाली. पोलीस सूत्रानुसार, पुलगांवच्या शासकीय धान्य गोदाम परिसरातील रहिवाशी हेमंत उर्फ गोलु देविदास जिचकार हा विशाल धोपाडे याच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ३२ एम ६२७२ ने बँकेतून रक्कम काढून पुलगावकडे येत होता. विरूळ (आकाजी) ते सोरटा मार्गावरील निजामपूर (टाकळी) फाटा परिसरात पुलगाव येथून आर्वीकडे स्कार्फ बांधून जाणार्‍या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी या दोघांना अडविले.

एकाने विशालच्या गाडीची किल्ली काढून हेमंत जिचकारजवळ असलेली पैशाची बॅग हिसकावून पळण्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला. यावेळी हेमंतने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चाकू हल्ला चढविला. यात हेमंतच्या डाव्या पायावर चाकूची जखम झाली. हीच संधी साधून त्या लुटारुंनी त्याच्याजवळची काळ्या रंगाची पैशाची बॅग घेवून पोबारा केला. उल्लेखनीय, हेमंतने दुपारी १.१५ वाजता बैंकेतून पैसे काढले. यानंतर अवघ्या १५ मिनिटांत ही घटना घडल्याने हा नियोजित कट असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी विरूळ स्टेट बैंकेच्या शाखेत जावून शाखा व्यवस्थापक प्रदीपकुमार दास तसेच रोखपाल जयकिशन बजाज यांना विचारणा केली असता हेमंतने सोरटा येथील शेती विकली. त्या रकमेचा धनादेश वटवून रक्कम घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. लुटारु चेहर्‍यावर स्कार्फ बांधून होते. एकाने काळा शर्ट घातला होता. घटनेची माहिती झाल्यानंतर जिल्ह्यात व जिल्हा सीमेवर नाकाबंदी करण्यात आली. या प्रकरणी रात्रीउशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.(प्रतिनिधी)