शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

5,546 पुरुष तर 5,272 महिला आता निवडणार लोकप्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 22:31 IST

विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश असून, रविवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीत ५ हजार ५४६ पुरुष तर ५ हजार २७२ महिला मतदार प्रत्यक्ष मतदान करून लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदाेबस्त राहणार आहे.

या ग्रामपंचायतींची होणार आहे निवडणूक- वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर), नांदोरा तर आर्वी तालुक्यातील सर्कसपूर, मांडला, अहिरवाडा, हैबतपूर (पु.), जाम (पु.), पिपरी भुतडा (पु.), मिर्झापूर (नेरी) या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, रविवार, १६ ऑक्टोबरला जिल्ह्यात एकूण ३३ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

सरपंच पदासाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात

- रविवार, १६ ऑक्टोबरला वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात येत आहे. असे असले तरी सरपंच पदासाठी सर्कसपूर येथे तीन, मांडला येथे पाच, अहिरवाडा येथे दोन, हैबतपूर (पु.) येथे तीन, जाम (पु.) येथे तीन, पिपरी भुतडा (पु.) येथे दोन, मिर्झापूर येथे दोन तर सालोड (हि.) येथे पाच आणि नांदोरा येथे दोघे आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक