शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

पर्यटन विकासाचे ५.३२ कोटी अखर्चित

By admin | Updated: August 24, 2015 01:59 IST

जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

केवळ १.६४ कोटींचे वितरण : संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीवर्धा : जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पैकी १ कोटी ६४ लाख रुपये वितरित झाले असून ५ कोटी ३२ लाख रुपये अद्यापही खर्चित आहे. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाना खीळ बसली आहे. गिरड, केळझर व कापसी येथील तिर्थस्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या स्थळांचा विकास करण्याकरिता शासनाच्यावतीने सन २०१३-१४ मध्ये हा निधी दिला. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हा निधी अद्याप अखर्चित असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला खिळ बसल्याचा आरोप वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. हा निधी खर्च न करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी एका पत्रकाद्वारे बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे एका पत्राद्वारे केल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०११-१२ मध्ये अंतर्गत बोरधरण येथील विकास कामांकरिता १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तो निधी खर्च करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत २० मार्च २०१३ रोजी प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरणाचे आदेश देण्यात आले होते. असे असताना हा निधी अद्यापही अखर्चित आहे. तो अखर्चित असल्याने या भागाच्या विकासकामांना खीळ बसली आहे. या निधीत बोरधरण भागात विविध खेळणींसह चिमुकल्यांना पिण्याकरिता पाणी, येणाऱ्या नागरिकांना बसण्याकरिता बाकांची व्यवस्था करावयाची होती. शासनाच्यावतीने रक्कम आली असताना या प्रकारातील कुठल्याही कामावर तिचा खर्च झाला नसल्याचे दिसून आले आहे.सन २०१३-१४ मध्ये समुद्रपूर तालुक्यतील गिरड येथील पर्यटन विकासाकरिता २ कोटी ६१ लाख, केळझर येथील विकासाकरिता ३ कोटी ८५ लाख रुपये तर हिंगणघाट तालुक्यातील कापसी येथे विकासकामाकरिता ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामांना ६ आॅगस्ट २०१४ रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता देत निधी वितरणाचे आदेश निर्गत केले. असे असताना या कामाकरिता आलेला संपूर्ण निधी अद्याप अखर्चित आहे. यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडला आहे. विकासाकरिता आलेला निधी विकास कामांवर खर्च न करता तो अखर्चित कशासाठी ठेवण्यात आला, हे न उलगडणारे कोडे आहे. अधिकाऱ्यांच्या या कामचुकारपणांमुळे मात्र जिल्ह्याच्या विकासकामांना खीळ बसली आहे. यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अखर्चित निधीची चौकशी करून तिचा या स्थळांचा विकास करण्याकरिता उपयोग करावा अशी मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे.केळझरच्या विकासकामांना बगल केळझर येथील मंदिर परिसराच्या सौदर्यीकरणासह स्वयंपाकघर, सभामंडप, मंदिर परिसरात सिमेंट रस्त्यासह, संरक्षक भिंत, पायऱ्यांचे बांधकाम यात करावयाचे होते. शिवाय मंदिर परिसरात व टेकडीवर रोषणाई, पिरबाबा टेकडीवर पाण्याचा पुरवठा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसराचे सौदर्यीकरण करण्याचे काम या निधीत करावयाचे होते. मात्र बांधकाम विभागाकडून कुठलेही काम करण्यात आले नाही. यामुळे या पर्यटन स्थळांना अद्यापही सौदर्य प्राप्त झाले नसल्याचा आरोप आ. भोयर यांनी केला आहे. लोकार्पणापुर्वीच गळली नवरगावची नवी आश्रमशाळा सेलू तालुक्यातीन नवरगाव येथील शासकीय आश्रमशाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले. इमारत पूर्ण झाली असताना आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीचा ताबा घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात विचारणा केली असता सदर इमारत लोकार्पण करण्यापूर्वीच आलेल्या पावसामुळे गळल्याचे येथील शिक्षकांनी सांगितल्याचेही आमदार म्हणाले.