शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 09:48 IST

अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारांना सोमवारी ५२ किलोचा चांदेरा प्रजातीचा (सिल्व्हर कार्प) मासा सापडला. धरणात पाणी भरल्यानंतर एवढा मोठा मासा प्रथमच मासेमारांच्या जाळ्यात अडकला आहे.

ठळक मुद्देविदर्भातील धरणात प्रथमच आढळला

आॅनलाईन लोकमतअमरावती : अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारांना सोमवारी ५२ किलोचा चांदेरा प्रजातीचा (सिल्व्हर कार्प) मासा सापडला. धरणात पाणी भरल्यानंतर एवढा मोठा मासा प्रथमच मासेमारांच्या जाळ्यात अडकला आहे.मोर्शी नजीकच्या नल-दमयंती सागर जलाशयात (अप्पर वर्धा धरण) मासेमारीचे कंत्राट वरूड तालुक्यातील राजुराबाजार येथील नल-दमयंती सागर मच्छिमार सहकारी संस्थेने घेतले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणावर मासेमारी करणारे पलांदूर येथील यशवंत, गुलाब व सुरेश मेश्राम यांच्यासह गोपी कांबळे हे सोमवारी सकाळी मासेमारीसाठी धरणात उतरले होते. त्यांच्या जाळ्यात हा मासा अडकला.अमरावती विभागातील दुसरे सर्वात मोठे जलाशय असलेले अप्पर वर्धा धरण मासेमारांसाठी मिळकतीच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते, असे यावेळी मासेमारी संघटनेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे यांनी सांगितले.सिल्व्हर कार्प या माश्याची प्रतिवर्ष पाच किलो याप्रमाणे वाढ होते. तो पाच ते सहा वर्षांचा असावा, असा अंदाज लावण्यात आला आहे.

मासेमारांसाठी नंदनवननल-दमयंतीसागर जलाशय मासेमारीसाठी नंदनवन ठरू लागला आहे. या जलाशयात दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मासेमार रोजगारासाठी आले आहेत. मासेमार संघात सध्या ५५० मासेमार असून, जलाशयात सुमारे ११०० मासेमार रोजगार मिळवू शकतात. धरणात विविध प्रजातींची बिजे टाकण्यात आली आहेत.

टॅग्स :Damधरण