शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

५२ दिवसांनी ‘त्या’ आंदोलनाची दखल

By admin | Updated: December 26, 2015 02:18 IST

येथील बस स्थानक परिसरात बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे वाटप नियमबाह्य केल्याचा आरोप करीत निर्भय पांडे या इसमाने शांततापूर्ण आंदोलन सुरू केले होते.

चौकशी अहवाल वरिष्ठांकडे : १२ दुकान गाळे बांधकामप्रकरणगिरड : येथील बस स्थानक परिसरात बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे वाटप नियमबाह्य केल्याचा आरोप करीत निर्भय पांडे या इसमाने शांततापूर्ण आंदोलन सुरू केले होते. ५२ दिवसानंतर या आंदोलनाची दखल घेत तहसीलदारांनी निर्भय पांडे आणि समुद्रपूरचे गटविकास अधिकारी यांची १९ डिसेंबर ला बैठक घेतली. तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती संबंधितांवर काय कारवाई होणार व गाळ्यांसंदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गिरड येथील बसस्थानक परिसरात ग्रामविकास आराखड्यातून १२ दुकान गाळे बांधण्यात आले. त्यातील काही गाळ्यांचा लिलाव झाला तर काही अतिक्रमण धारकांना व अपंगाना वाटप करण्यात आले. परंतू सदर गाळेवाटप हे ग्रामपंचायतने गैर मार्गाने व नियमबाह्य केल्याचा आरोप करीत येथील निर्भय पांडे याने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू केले. यात त्याला सहा दिवस तुरुंगातही जावे लागते. तरीही त्याने आंदोलन सुरूच ठेवले. अखेर ५२ दिवसांनंतर समुद्रपूर येथील तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले. बिडीओंनी ग्राम विकास विस्तार अधिकारी समुद्रपूर यांच्या मार्फत चौकशी केली. या चौकशीत गाळे वाटप नियमबाह्य झाल्याचे जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या अहवालात नमूद केले. तसेच ग्राम पंचायतचा ठराव मंजूर नसताना गाळे वाटप करणे, गाळे धारकांकडून अनामत जमा करून करारनामा करणे यासाठी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना कार्यवाहीस पात्र धरण्यात आले, तसेच तत्कालीन सरपंचांनासुद्धा कारवाईस पात्र धरले आहे. यामुळे येथील राजकीय व शासकीय वर्तूळात हा मुद्दा वारंवार चर्चिला जात आहे. आता तरी तक्रारकर्त्यांस न्याय मिळणार काय, गाळे वाटपाचा फेर लिलाव होणार काय, झालेले गाळे वाटप रद्द होईल काय यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होते याकदे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर आंदोलन परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल ५२ दिवसांपासून सदर आंदोलन सुरू आहे. आठवडाभरात प्रकरण निकाली काढून संबंधितांवर कारवाई करावी तसेच आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी पांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.(वार्ताहर)