उत्पादन कमी तरीही आवक वाढीवरच : हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आवक रूपेश खैरी ल्ल वर्धा जिल्ह्यात खरिपाच्या काळात झालेल्या अनियमित पावसाचा परिणाम सोयाबीनवर झाला. सरासरी एकरी दोन पोत्यांची उतारी आली. सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न झाले असतानाही मात्र बाजारपेठेत यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. सातही बाजार समितीत एकूण ५ लाख १५ हजार ६३७ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. ही खरेदी गत वर्षापेक्षा अधिक आहे. २०१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४ लाख ७७ हजार २२४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती. यंदाच्या खरीप हंगामात एकूण दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. यात एकरी चार क्विंटल उतारी येथील असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे त्यांचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले. जिल्ह्यात एकरी दोन पोत्याची उतारी आली. यातही कुठे सोयाबीनचा दाणा बारीक झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला. सोयाबीन हातचे गेले असे चित्र असताना बाजार समितीत मात्र उलटच चित्र आहे. येथे सोयाबीन गत वर्षीच्या तुलनेत अधिक झाल्यावचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीत येत असलेल्या वर्धा बाजार समितीत यंदाच्या हंगामात ६९ हजार ६३७ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले. येथे गत हंगामात या काळापर्यंत ४४ हजार ७३० क्विंटल सोयाबीन खरेदी झाले होते. यंदा येथे सरासरी ३,८०० रुपयांचा दर देण्यात येत आहे. हिंगणघाट बाजार समितीत ३ लाख ४८ हजार ४५१ क्विंटलची खरेदी झाली. तर गत वर्षी ३ लाख ११ हजार ३३३ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती. या बाजार समितीत बाहेर जिल्ह्यातील सोयाबीन आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथे यंदाच्या हंगामात ३,५०८ तर गत हंगामात ४,०४५ रुपये क्विंटलचा दर देण्यात आला होता. इतर बाजार समितीत मात्र आवक घटल्याचे चित्र आहे.गत वर्षीच्या तुलनेत ३८ हजार क्विंटलची खरेदी अधिक ४जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत ४ लाख १५ हजार ६२७ क्विंटल सायोबीनची खरेदी झाली आहे. ही खरेदी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गत हंगामात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४ लाख ७७ हजार २२५ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. सातही बाजार समितीत असलेल्या या आकडेवारीवरून यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ३८ हजार ४१३ क्विंटलची खरेदी अधिक झाली आहे.४झालेली खरेदी जिल्ह्यातील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडे गत वर्षी जमा करून ठेवलेले सोयाबीन आल्याचे सांगत आहे. वर्धा बाजार समितीत शेतकऱ्यांशी सोयाबीनच्या दर्जावरून होणारी भावबाजी नित्याचीच४वर्धा बाजार समितीत सोयाबीनची आवक सुरूच आहे. बाजारपेठेत आलेल्या सोयाबीनला दर देताना व्यापारी व शेतकऱ्यांत मिळणाऱ्या दरावरून चांगलीच घासाघीस होत असल्याचे दिसून आले आहे. येथे चांगल्या सोयाबीनला ३ हजार ८०० तर त्यापेक्षा कमी दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार रुपयांच्या आसपास दर दिले जात आहे. तर मातीमिश्रीत सोयाबीनला १२०० ते १४०० रुपये दर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे येथे सोयाबील घेवून आलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन अत्यल्प दरात खरेदी करावी लागत असल्याचे दिसून आले आहे.४यंदाच्या हंगामात वर्धा बाजार समितीत मिळत असलेला दर सार्वत जास्त असल्याचे येथील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढल्याचे बोलले जात आहे. ४जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी हिंगणघाट बाजार समितीत झाली आहे. शेतकऱ्यांना दर देण्यात या समितीचे नाव असले तरी त्यापेक्षा ही बाजार समिती राष्ट्रीय महामार्गावर असल्याने त्याचाच अधिक लाभ झाल्याचे बोलले जात आहे. या बाजारपेठेत जिल्ह्यातील कमी तर बाहेर जिल्ह्यातील सोयाबीन अधिक येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बाजार समितीत यंदाच्या हंगामात ३,५०० रुपयांच्या आसपास दर दिले जात आहे. ४इतर बाजार समितीत मात्र चित्र उलट असल्याचे दिसून आले आहे. येथे गत हंगामाच्या तुलनेत यंदा घटच झाल्याचे दिसून आले आहे. येथील आवक त्या भागात पडलेल्या दुष्काळाची आठवण करून देत असल्याचे दिसून आले आहे.शेतकऱ्यांना दरवाढीची आशा४जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे उत्पदान अत्यल्प झाले. यात व्यापाऱ्यांच्या घरी असलेले सोयाबीन संपले आहे. आता बाजारात येणारे सोयाबीन शेतकऱ्यांचे आहे. यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
५.१५ लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी
By admin | Updated: November 24, 2015 05:03 IST