शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीसाठी ५० लाखांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:04 IST

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने औषधी खरेदीकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमिनी मंत्रालयाच्या स्थायी समिती बैठकीत सर्वानुमते निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने औषधी खरेदीकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयास सवार्नुमते मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात गुरुवारी, २७ डिसेंबरला स्थायी समितीची सभा पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, सभापती मुकेश भिसे, सोनाली कलोडे यांची उपस्थिती होती. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेदरम्यान आरोग्य विभागांतर्गत औषधींच्या तुटवड्याचा मुद्दा पुढे आला.जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८१ उपकेंद्र, २१ अ‍ॅलोपॅथीक दवाखाने, ११ आयुर्वेदिक दवाखाने आहेत. या दवाखान्यांना औषधीसाठा वितरण आरोग्य विभाग औषधी भांडाराअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून झालेली मागणी तसेच उपलब्ध औषधीसाठ्याच्या संख्येनुसार केले जाते. पण, औषधी पुरवठ्याचे कंत्राट असलेल्या कंपनीमार्फत वेळेवर औषधीसाठा उपलब्ध केला जात नसल्याने औषधींचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असल्याने औषधीच्या तुटवड्यावर तोडगा काढण्याची मागणी होऊ लागली. हा मुद्दा सभागृहात चर्चेला आला. त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीमध्ये तरतूद असलेल्या ५० लाख रुपयांतून औषध खरेदीच्या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सरकारी दवाखान्यांतील औषधींचा तुटवडा दूर होण्यास आता मदत होणार आहे.सोलर आॅटोमायजेशनसाठी शासनाकडे निधीची मागणीग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना विजेवर आधारित आहे. ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने विद्युत देयक भरताना आर्थिक अडचणी निर्माण होतात. बरेचदा आर्थिक अडचणीमुळे देयक न भरल्यास वीजपुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा योजना बंद होतात. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना सोलर आॅटोमायजेशन करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला. सोलरवर पाणीपुरवठा योजना परिवर्तीत केल्यास खर्चात बचत होण्यास हातभार लागेल. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजना सोलर आॅटोमायजेशन करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करणाऱ्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :medicineऔषधंhospitalहॉस्पिटल