शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कारमधून ५० किलो गांजा जप्त

By admin | Updated: May 24, 2017 00:42 IST

हिंदनगर येथे मोठ्या प्रमाणात गांजा आल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड घालून ४९ किलो ८०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

दोघांना अटक : एकूण ५.५० लाखांचा मुद्देमाल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हिंदनगर येथे मोठ्या प्रमाणात गांजा आल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड घालून ४९ किलो ८०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रचीन उत्तम गायकवाड (३३) रा. हिंदनगर, सिंदी (मेघे), प्रखील शिवदास शंभरकर रा. उगले ले-आऊट, सेवाग्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत गांजा, कार व इतर साहित्यासह ५ लाख ५५ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सुत्रानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना प्रचीन गायकवाड हा त्याच्या दोन साथीदारासह एमएच १२ सीआर ९४५६ क्रमांकाच्या कारने पवनार मार्गे सिंदी (मेघे) येथील हिंदनगर परिसरात गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी प्रचीन गायकवाड व प्रखील शंभरकर व अन्य एक इसम यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत छापा घातला. यात त्यांच्या ताब्यातील कारमध्ये गांजा मिळून आला. हा गांजा प्रचीन गायकवाड याच्या घरात लपविण्याचे प्रयत्नात सुरू होते. घटनास्थळी पोलीस पोहोचताच आरोपी प्रखील शंभरकर व अन्य एकाने घटनास्थळावरून पळ काढला. पंचासमक्ष गायकवाडच्या घराची झडती घेतली असता एकूण ४९ किलो ८०५ ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत २ लाख ४९ हजार २५ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच ३ लाख रुपयांची कार व तीन मोबाईल असा एकूण ५ लाख ५५ हजार २५ रुपयांचा मुद्दमाल मिळून आला. या प्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग बी. पोटे, पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, पोलीस स्टाफ संजय देवगीरकर, परवेज खान, नरेंद्र डहाके, गिरीश कोरडे, संजय ठोंबरे, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, कुलदीप टांकसाळे, समीर कडवे, जगदीश डफ, सचिन खैरकार, जोत्सना शेळके, चालक नापोशि भूषण पूरी, विलास लोहकरे यांनी केली.