शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशीदारुसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:46 IST

खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आहे.

ठळक मुद्देदोन दारूविक्रेते अटकेत : समुद्रपूर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आहे. सदर आरोपींविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहीती नुसार, समुद्रपूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर जाम-हिंगणघाट मार्गावर पी.व्ही.टेक्सटाईल शिवारात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान एम.एच. ३२ एल. ७४६२ क्रमाकांच्या दुचाकीला अडवून दोघांना ताब्यात घेण्यात आले. सदर तरुणांजवळील साहित्याची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या कारवाईत ७ हजार २०० रुपये किंमतीची ७२ शिश्या देशी दारू व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ४७ हजार २०० रुपयांचा मुुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुनील नारायण मेश्राम आणि नितिन सुरेश भोयर दोन्ही रा. बुरकोनी तालुका हिंगणघाट यांच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे आदींनी केली.दुचाकीसह दारुसाठा पकडलापुलगाव- खात्रिदायक माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी मौजा ठाणेगाव येथे नाकेबंदी करून दारूची तस्करी करणाºया प्रमोद लक्ष्मण नवरंग (३४) व प्रमोद भाऊराव घोडमारे (३६) दोन्ही रा. रोहणा यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एम.एच. ४० बी. ७१८५ क्रमांकाच्या दुचाकीसह देशी दारू असा एकूण २० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे प्रभारी ठाणेदार बी. के. ढोले, दिलीप ठाकुर, अशोक भोयर, विवेक बनसोड, अनिल भोवरे, निकेश गुजर, पवन निलेकर, विकास मुंडे यांनी केली आहे. शहरात कुठेही दारूची विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन ढोले यांनी केले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीArrestअटक