शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आष्टी तालुक्यातील ४७0 शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 24, 2014 23:50 IST

विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज देवून विहिरींसाठी भरघोस अनुदान दिले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन वीजजोडणीचे

आष्टी (शहीद) : विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज देवून विहिरींसाठी भरघोस अनुदान दिले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन वीजजोडणीचे अर्ज विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकर्‍यांनी सादर केले. मात्र अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका शेतकर्‍यांना बसला. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील ४७0 शेतकरी वीजजोडणीच्या प्रतिक्षेत आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर होणार असे संकेत दिसत आहेत.

महिनाभरात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होणार आहे. शेतकर्‍यांनी शेतीची नांगरणी तथा वेचणी करून ठेवली आहे. मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत: राबराब राबवून कष्ट करीत आहे. त्यातच पॅकेजची विहीर कर्जबाजारी होवून बांधली. त्यानंतर अनेक दिवसांनी अनुदान मिळाले. आता विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर तात्काळ वीज जोडणीची अपेक्षा शेतकर्‍यांना होती. यासाठी तालुका स्तरावर असलेले विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंता कार्यालयात अर्ज सादर केले.

संबंधित अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबवित असल्याने शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जाता जाता भुईसपाट होत आहे. तरीसुद्धा खरीपाची पिके सोडली तर रब्बी व उन्हाळी पीक येण्याची हमखास आशा आहे. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था असणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. या सर्व समस्यांचा विचार करणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना आवश्यक आहे. येथील कार्यालयातील कर्मचारी आठवडाभर गैरहजर राहतात. अभियंता दुर्लक्षित धोरण अवलंबवित असल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. वीजेशिवाय शेतात सिंचन कसे करायचे विचारात शेतकरी पुरता खचून गेला आहे.

सन २00५ मध्ये विद्युत वितरण कंपनीने महिनाभरात शेतकर्‍यांना वीजजोडणी देण्याचे आदेश निर्गमित केले होते. शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित अधिकारी करीत नाही. यावर्षी शेतकरी अनेक संकटात आहे. हातात आलेली पीके हातून जात आहे. शासनाचे अनुदान मिळत नाही. तोंडाला पाने पुसणारी मदत पाहून अनुदान न दिलेले बरे! अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असतानाही जोडणी मात्र लवकर मिळण्यास तयार नसल्याने वीज जोडणी तात्काळ देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली आहे.(प्रतिनिधी)