शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आर्वी उपविभागात ४ हजार ६०८ लाभार्थी

By admin | Updated: February 27, 2015 00:01 IST

खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील ११२ महसूल मंडळातील ४६०८ ...

आर्वी : खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील ११२ महसूल मंडळातील ४६०८ शेतकरी कपाशी व सोयाबीन या पिकासाठी काढलेला फळपीक विमा योजनेसाठी लाभार्थी ठरले आहे. त्यांना १.५३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील कपाशी पिकासाठी २ हजार ६३० शेतकऱ्यांचा लाभार्थ्यांत समावेश आहे. त्यांच्यासाठी १ कोटी २० लाख ९ हजार १०४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सोयाबीन पिकासाठी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील १ हजार ९७८ शेतकरी लाभार्थी ठरले आहे. त्यांच्यासाठी ३८ लाख २२ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मिळणर आहे. आर्वी तालुक्यात आर्वी, खरांगणा, रोहणा, वाठोडा, विरूळ, आष्टी तालुक्यातील आष्टी, साहूर, तळेगाव तर कारंजा (घा.) तालुक्यात कारंजा, कन्नमवारग्राम, सारवाडी या तीन तालुक्यातील ११ महसूल मंडळाचा समावेश आहे. तीन वर्षांपासून आर्वी उपविभागात दुष्काळ, नापिकी, खराब हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने शेती व्यवसाय वर्षदर वर्ष तोट्याचा ठरत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना वाढीस लागली आहे. त्यात नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची सर्वत्र आर्थिक लुट सुरू असल्याचे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)तीनही तालुक्यातील एकूण लाभार्थीकपाशी पिकासाठी महसूल मंडळ निहाय लाभार्थी शेतकरी आहेत. आर्वी २२७, खरांगणा ८९५, रोहणा ५३१, वाठोडा ३०, विरूळ ३९, आष्टी तालुका आष्टी २३१, साहूर ४४, तळेगाव २३३, कारंजा तालुका कारंजा १८४, कन्नमवारग्राम ७४, सारवाडी ८८ आदी लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. सोयाबीन पिकासाठी १,९७८ शेतकरी लाभार्थी ठरले आहे. या सोबतच आर्वी १५३, खरांगणा ८६३, रोहणा ५१२, विरूळ १, आष्टी तालुका आष्टी ४६, साहूर १६, कारंजा तालुका कारंजा १५३, कन्नमवारग्राम १४४, सारवाडी ६८ आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.