शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांकडे 45 तर डीएलसीकडे सात तक्रारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यावर या योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी विविध बँकांकडून मागविण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील ५९ हजार ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. त्यापैकी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करून ५२ हजार ९४३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले, तर काही शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

ठळक मुद्दे५१,३१४ शेतकऱ्यांना मिळाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्तीचा लाभ

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील भाजप सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करीत त्याची अंमलबजावणी केली. भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या तुलनेत महाविकास आघाडीची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही अधिक पारदर्शी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असले तरी तहसीलदारांकडे ४५, तर जिल्हास्तरीय समिती (डीएलसी) कडे सात तक्रारी अजूनही प्रलंबित असल्याचे वास्तव आहे.प्राप्त माहितीनुसार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यावर या योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी विविध बँकांकडून मागविण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील ५९ हजार ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. त्यापैकी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करून ५२ हजार ९४३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले, तर काही शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. आधार प्रमाणीकरण केलेल्यापैकी ५१ हजार ३१४ शेतकऱ्यांची कर्ज खाती योजनेच्या लाभास पात्र ठरवून या कर्जखात्यांत आतापर्यंत एकूण ४५४.३५ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. असे असले तरी सध्या तहसीलदारांकडे ४५, तर जिल्हास्तरीय समितीकडे कर्जमुक्ती योजनेबाबतच्या सात तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारी वेळीच निकाली काढण्याची गरज आहे.

१,४८५ शेतकऱ्यांनी केले नाही आधार प्रमाणीकरणमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील ५२ हजार ९४३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असले तरी तब्बल १ हजार ४८५ शेतकऱ्यांनी अद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अडचणीत भर पडली आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी