शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कारसह ४.४७ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:05 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे डी.एल.०४ सी.ए.ई. ४१७० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय अविनाश यादव रा. नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देएकास अटक : स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे डी.एल.०४ सी.ए.ई. ४१७० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय अविनाश यादव रा. नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे.पुलगावकडून दहेगाव मार्गे वर्धेकडे दारूसाठा आणल्या जात असल्याची माहिती मिळताच सावंगी परिसरात नाकेबंदी करण्यात आली. काही वाहनांची पाहणी केल्यावर या वाहनात दारूसाठा आढळून आला. वाहनातील अविनाश यादव (२६) याला ताब्यात घेवून त्याच्याजवळून वाहनासह एकूण ४ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई निरंजन वरभे, संजय ठोंबरे, राकेश आष्टनकर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, गणेश खेवले यांनी केली.साहूर पारधी बेड्यावर ‘वॉश आऊट’आष्टी (शहीद) : साहुर येथील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू अवैधरित्या तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती ठाणेदार रेवचंद्र सिंगनजुडे यांना मिळाली. त्या आधारे आष्टी पोलिसांच्या चमुने साहुरच्या पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोहरसायन सडवा व गावठी दारू नष्ट करून दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आष्टी तालुक्यात गेल्या काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकल्या जात होती. मात्र, ठाणेदार सिंगनजुडे रूजू झाल्यावर त्यांनी या अवैध दारूविक्रीला आळा घातल्याचे दिसते. वारंवार धाडी टाकून दारूविक्रेत्यांना धडा शिकवला. पुन्हा दारूविक्रीचा व्यवसाय आपले पायमुळ घट्ट करू पाहत असल्याचे निदर्शनास येताच आष्टी पोलिसांनी सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी साहुर पारधी बेड्या येथील प्रकाश भोसले (५२) यांच्यावर दारूविक्री प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक डी. एस. केकन, राजू दहिलेकर, विनोद वरहारे, महेंद्र अंबुडारे, रवींद्र रघाटाटे, खोमदेव वैरागडे, विलास राठोड, निलेश वंजारी, नंदकिशोर वाढवे, बाबासाहेब गवळी, निखिल वाणे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी