शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

४.२८ लाख हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:30 IST

जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये.

ठळक मुद्दे१०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करा : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असले तरी मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. काही शेतकऱ्यांकडून धूळ पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जोवर कमीत कमी १०० मिमी पाऊस पडत नाही तोवर शेतकऱ्यांनीही पेरणी करू नये. अल्प पावसानंतर पेरणी झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यंदा खरीब हंगामात एकूण ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. खरीप ज्वारी १ हजार १०० हेक्टर, ६५ हजार हेक्टरवर तूर, ४०० हेक्टरवर मुंग, ७०० हेक्टरवर उडीद, ६७५ हेक्टरवर खरीप भुईमुंग, १ लाख २५ हजार ९२५ हेक्टरवर सोयाबीन तर २ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड होणार आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. शिवाय ज्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे अशाच शेतकऱ्यांकडून सध्या धूळ पेरणीला गती दिली जात आहे. तळेगाव (टा.), सेलू परिसरात सध्या धूळ पेरणी केल्या जात असल्याचे दिसून येते. मात्र, पावसाने दगा दिल्यास याही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर खत आणि बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच व्यवहार करावा, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बियाण्यांसाठी पैशाची जुळवाजुळवमागील दोन वर्ष निसर्गाने दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या उसनवारी आणि घरच्या लक्ष्मीचे सोन्याचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे खरेदी करण्याच्या कामाला काही शेतकरी प्राधान्य देत आहे. अशातच दुबार पेरणीचा फटका अनेकांना न सहन करणाराच ठरणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.पीक कर्ज प्रस्ताव धूळ खातवेळीच पीक कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खतांची खरेदी सहज करता येणार आहे. परंतु, काही बँकांमध्ये अनेक पीक कर्जचे प्रस्ताव धूळ खात असल्याचे दिसून येते. तर २४ जुलैपर्यंत पीक विमासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याचाही लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापूस गाठींचे होणार उत्पन्न२ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापूस या पिकाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती न येता शेतकऱ्यांवर निसर्ग मेहरबान राहिल्यास एकूण ६ लाख ३९ हजार १४३ गाठी कापसाचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.८.९६ लाख क्विंटल उत्पादन होण्याची शक्यतायंदाच्या वर्षी खरीप हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. निसर्गाने साथ दिल्यास यंदा हंगामाच्या शेवटी एकूण ८ लाख ९६ हजार ९७८ क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.येत्या काही दिवसात दमदार पाऊस आल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी शेती करतानाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दक्षच राहिले पाहिजे. शिवाय दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये म्हणून कमीत कमी १०० मिमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती