शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

४१६ पोलिसांसह एसआरपीचे जवान तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 20:57 IST

गुरूवारी, २३ मे रोजी एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच एसआरपीच्या एका प्लाटूनचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशहरात राहणार चोख बंदोबस्त : पोलीस नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठेवणार करडी नजर

वर्धा : गुरूवारी, २३ मे रोजी एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच एसआरपीच्या एका प्लाटूनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर शहरातील बारीक-सारीक घडामोडींवर पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.मतमोजणीदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे ३७ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ३४० पुरुष आणि ३९ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तणावासारखी परिस्थिती ओढावल्यास त्या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी काही बंदुकधारी जवानही खडा पहारा देणार आहेत. त्यामुळे एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. याच परिसरात इंदिरा गांधी उड्डाणपूल असून एक मार्ग बरबडी, तर दुसरा सेवाग्राम रुग्णालयाकडे जातो. त्यामुळे या मार्गावर कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून निवडणूक बंदोबस्तादरम्यान घेण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीकडे गोदाम परिसरात जाण्याची पास, शिवाय ओळखपत्र आहे, अशांनाच मुख्यद्वारावरून प्रवेश मिळणार असल्याचे सांगण्यात आले.ओळखपत्र असेल तरच ‘एन्ट्री’एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमचा गोदाम परिसर बºयापैकी मोठा आहे. तेथे मतमोजणीसाठी विविध कक्षही तयार करण्यात आले आहे; पण ज्या व्यक्तीकडे आत जाण्यासाठीची पास अथवा ओळखपत्र आहे अशांनाच प्रवेश मिळेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९