शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३,४५६ वाहन चालकांना ४१.३१ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:15 IST

सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहेल्मेट न वापरणाऱ्या ९४३ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून सध्या हेल्मेटसक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.जून महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने १८ वाहनचालकांवर कलम ६६(२), १९२ अन्वये कारवाई करून त्यांच्याकडून २ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर विना नंबर प्लेट वाहन आढळून आल्याने २३ वाहनचालकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ७१२ वाहनचालकांनी त्यांची वाहने नो-पार्किंग परिसरात उभी केल्याने त्यांना १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसुली करण्यात आली आहे.ट्रिपल सिट प्रवास करताना आढळून आल्याने ६० वाहनचालकांकडून १ लाख ५५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांना पाठ दाखवित राँग साईडने वाहन नेणाऱ्या २१ जणांकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी प्रवासादरम्यान हेल्मेटचा वापर न करताना आढळल्याने ९४३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना बगल देणाऱ्या १३ हजार ४५६ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४१ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.२५ वाहनचालकांना मोबाईवर बोलणे भोवलेगत सहा महिन्यांच्या कालावधीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºयांवर ठिकठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहनचालविताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणाराच प्रकार असला तरी अनेक वाहनचालक याकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते.वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ७७ जणांना दंडमागील सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी ७७ जणांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे कारण पुढे करीत त्यांच्याकडून १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस