शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ४० संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:09 IST

६०-६५ वर्षांपासून प्रलंंबित असलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता निर्वाणीची लढाई लढण्याचा निर्णय विदर्भवादी नेत्यांनी घेतला आहे. ४० संघटना एकत्रितरित्या या मुद्यावर सरकारला विशेषत: भाजपला घेरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ठळक मुद्देपावसाळी अधिवेशन बंद पाडणारसूत्र तरूणांच्या हाती सोपविणार

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील ६०-६५ वर्षांपासून प्रलंंबित असलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता निर्वाणीची लढाई लढण्याचा निर्णय विदर्भवादी नेत्यांनी घेतला आहे. ४० संघटना एकत्रितरित्या या मुद्यावर सरकारला विशेषत: भाजपला घेरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नागपूर येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाला पहिल्याच दिवशी बंद पाडण्याचा निर्धार या संघटनांनी घेतला आहे.१९६० पूर्वी मध्यप्रदेश प्रांतात असलेल्या विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला. त्यानंतर उपराजधानीचा दर्जा देऊन वैदर्भीय जनतेची बोळवण करण्यात आली. तेव्हापासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात विदर्भ विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढला असून आता राज्यावर कर्जाचा बोझाही वाढलेला आहे. या बोझ्यात विदर्भाच्या विकासासाठी निधी मिळण्याची शक्यना नसल्याने आता स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्यासाठी ४० संघटना एकत्रित आल्या आहेत. ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर बंद करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. विदर्भ राज्याच्या आंदोलनाची धुरा आता नव्या पिढीकडे सोपविण्यात आल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. १ मे रोजी नागपूर येथे झालेले आंदोलन तरूणांच्या नेतृत्वातच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तरूणांनी ‘ड्रोन’च्या साह्याने नागपूर विधीमंडळावर विदर्भाचा झेंडा फडकविला, अशी माहितीही त्यांनी दिली. संपूर्ण विदर्भातून विविध पक्षात काम करणारे नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत. यामुळे २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची अडचण विदर्भाच्या मुद्यावर वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भ राज्याचा अर्थसंकल्प शिल्लकीचास्वतंत्र विदर्भ राज्याला घेवून यापूर्वी दोन वेळा प्रतिरूप अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात आले होते. या अधिवेशनात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात २०१४-१५ मध्ये विदर्भ राज्याचे उत्पन्न ४१,५१० कोटी, खर्च ४१,४०० कोटी तर शिल्लक १ कोटी दाखविण्यात आली होती. २०१७-१८ मध्ये उत्पन्न ५४,०४० कोटी, खर्च ५२,३८० कोटी व शिल्लक १६६० कोटी दाखविली आहे. हा अर्थसंकल्प विदर्भ राज्य समितीच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला. आजवर कुणीही आकडेवारीवर आक्षेप घेऊ शकले नाही. याचा अर्थ विदर्भ राज्य सक्षम असल्याचे स्पष्ट होते, असा दावा अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

भुवनेश्वरच्या ठरावावर अंमलबजावणी कराअटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतीय जनता पक्षाने भुवनेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या ठराव पारित केला होता. त्यानंतर भाजपने केंद्रात सरकार असताना छत्तीसगड, झारखंड व उत्तरांचल या तीन राज्यांची निर्मिती केली; पण विदर्भाला न्याय दिला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये विदर्भ राज्य समितीला विदर्भ राज्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ४० संघटनांच्या एकीकरणातून उभ्या राहणाºया या आंदोलनाने भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे.६ जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर बंदचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात ४० संघटना सहभागी होत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विदर्भवादी पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन आम्ही केले आहे.- अ‍ॅड. राम नेवले, विदर्भवादी नेते.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८