शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

३.८६ लाखांचे धान्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:01 IST

आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील ओम ट्रेडर्स नामक दुकानात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.

ठळक मुद्देदेऊरवाडा येथील ओम ट्रेडर्स मध्ये गहू अन् तांदळाचा काळा बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील ओम ट्रेडर्स नामक दुकानात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सदर गोदामात धाड घातली असता मोठ्या प्रमाणात शासकीय गहू आणि तांदळाचा साठा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ८६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गोदामात पोलिसांनी धाड टाकली असता येथे शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात रिपॅकींग होत असल्याचे समोर आले. आर्वी पोलिसांनी मदतीने केलेल्या या कारवाईत दुकान मालक निरज सुरेश जोशी रा. स्टेशन वॉर्ड, आर्वी हा गोदामातच हजर मिळून आला. सदर गोदामामध्ये अवैधरित्या साठवणुकीचे स्वस्त धान्य गहु भरून असलेले सरासरी ५० किलो वजनाचे १७२ पोते, अ‍ॅप्पल ब्रॅन्ड असलेले स्वस्त धान्य तांदुळ भरुन असलेले सरासरी ५० किलो वजनाचे २०२ पोते, सरकारी स्वस्त धान्याचे खाली पोते, पोत्यांच्या शिलाईकरिता शिलाई मशीन इत्यादी असा एकूण किंमत ३ लाख ८६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे.आरोपीस ताब्यात घेवून स्वस्त धान्याच्या अवैध साठवणुकीकरिता आर्वी पोलीस ठाण्यात कलम ३,७ जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात स्वस्त धान्याच्या अवैध तस्करीची व्यवसायास मोठी खीळ बसली असून यासंबंधाने या व्यवसायात सहभागी असणारे मोठे मासे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात निरीक्ष्रक पराग पोटे, आर्वीचे ठाणेदार प्रभारी अशोक चौधरी, अचल मलकापुरे यांच्या संयुक्त निर्देशावरुन जितेंद्र चांदे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार सलाम कुरेशी, नरेंद्र डहाके, नापोशि किशोर आप्तुरकर व स्थानिक पोलीस ठाण्याचे हवालदार विक्की म्हस्के, अमित जुवारे यांनी संयुक्तपणे केली आहे.