शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

3,82,868 ग्रामीणांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकडे पाठच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ६ लाख ९१ हजार ८८१ लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या काेविड संकटात कोविड मृत्यू रोखण्यासाठी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस हाच खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल ३ लाख ८२ हजार ७६८ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवातझाली असून, प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट या उद्देशाने सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोविड लसीकरण मोहिमेला गती देत आहे. जिल्ह्यात एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या ६ लाख ९१ हजार ८८१ लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट आहे. २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत उद्दिष्टापैकी ३ लाख ९ हजार ११३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८८,१८९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. ४४.६८ टक्के ग्रामीण नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असला तरी अजूनही ३ लाख ८२ हजार ७६८ लाभार्थ्यांनी कोविडची लस घेतलेली नाही. त्यामुळे कोविडची तिसरी लाट  ओढवण्यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीबाबत प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.

१०० टक्के व्हॅक्सिनेट गावाला मिळणार पुरस्कार- गावपातळीवर लसीकरणाला गती मिळत प्रत्येक गाव १०० टक्के व्हॅक्सिनेट व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाकडून पाच लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण झालेल्या ग्रामपंचायतीला आता बक्षीसही मिळणार आहे. बक्षीसाची रक्कम गाव विकासावर खर्च करता येणार आहे.

सर्वाधिक लाभार्थी वर्धा तालुक्यात- जिल्ह्यात आठ तालुके असून, एकूण ५२० ग्रामपंचायती आहेत. हिंगणघाट तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील ८३ हजार ६७८ लाभार्थी, वर्धा तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील १ लाख ८३ हजार २७२ लाभार्थी, कारंजा (घा.) तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमधील ६८ हजार ९०७ लाभार्थी, आष्टी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीमधील ४९ हजार ६८८ लाभार्थी, देवळी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीमधील ८० हजार २३० लाभार्थी, आर्वी तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीमधील ७३ हजार ४४५ लाभार्थी, सेलू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमधील ७० हजार ७९७ लाभार्थी तसेच समुद्रपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमधील ८१ हजार ४०९ लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या