शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात साधारणत: मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते.

ठळक मुद्दे६०४.८८ लाखांची तरतूद : आराखड्यांतर्गत विविध उपाययोजना

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याबाबतचे सर्वेक्षण केले असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ आराखडा निश्चित केला आहे. याकरिता ६०४.८८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात साधारणत: मार्च-एप्रिलपासून पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागते.गतवर्षी समाधानकारक पावसाअभावी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. जानेवारी-फेब्रुवारीतच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याची ओरड सुरू झाली. यानंतर शहरातही टंचाई निर्माण होऊ लागली. शहराच्या मध्यवस्तीतील कूपनलिका, विहिरींना कोरड पडली. यामुळे शहरासह लगतच्या ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाण्याची साठवणूक करण्याकरिता कधी नव्हे, एवढी विक्रमी पाणी टाकीची विक्री झाली.जिल्हा प्रशासनाच्या पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यांतर्गत ९३ गावांत ११३ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, तर १६५ गावांतील १६८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. आठ गावांत टॅकरद्वारे पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. १३९ गावांत नळपाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येणार असून याकरिता अपेक्षित खर्च ६२.९० लाख इतका रुपये आहे. वेळीच दुरुस्तीची कामे पूर्णत्वास गेल्यास नागरिकांना दिलासाच मिळणार आहे.६५ गावांत नवीन ७४ विंधन विहिरीगतवर्षी जिल्ह्यात जलसंकट गडद झाले होते. वर्धा शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या येळाकेळी व पवनार येथील धाम नदीनेही तळ गाठला होता. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने शहराने गतवर्षी प्रथमच जलसंकट अनुभवले. यावेळी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ६५ गावांत ७४ विंधन विहिरी घेण्यात येतील. एप्रिल ते जून या कालावधीत या विंधन विहिरींद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाणार आहे.मागीलवर्षी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भीषण जलसंकट होते. त्यामुळे अनेकांनी शोषखड्डे आणि पाणी पुनर्भरण प्रकल्प उभारले. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पाणी पुनर्भरणाची व्यवस्था नाही. वारेमाप उपस्यामुळे भूगर्भातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असून पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याची नितांत गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी परिसरात जिरविल्यास गावातील जलस्रोत वाढविण्यासाठी मदत हाईल. याकरिता प्रशासनानेच नव्हे, तर नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीकपात