शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

रेल्वेच्या वर्धा स्थानकावर आठ महिन्यांत 36 हजार फुकटे प्रवासी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 22:39 IST

एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेतला जातो. तिकीट तपासणीची माेहीम राबविली जाते. मात्र, तरीदेखील फुकट्या प्रवाशांनी चांगलीच डोकेदुखी वाढविली आहे, हे मात्र तितकेच खरे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आणि पकडल्या जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वर्धा विभागाने केलेल्या वर्धा स्थानकावरील कारवाईत जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३६ हजार फुकटे प्रवासी पकडले गेले असून, त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाख ९९ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरून सध्या प्रवासी आणि गाड्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिन्याला कारवाईचा आढावा घेतला जातो. तिकीट तपासणीची माेहीम राबविली जाते. मात्र, तरीदेखील फुकट्या प्रवाशांनी चांगलीच डोकेदुखी वाढविली आहे, हे मात्र तितकेच खरे. 

योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा -  सध्या तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. -  तिकीट तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन वर्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

तर तुरुंगवासाचीही तरतूद....विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या ३६ हजारांवर जाऊन पोहोचली असून, त्यांच्याकडून दंडही आकारण्यात आला आहे. अशा सर्व फुकट्या प्रवाशांना रेल्वेच्या नियमांनुसार दंड भरावाच लागणार आहे. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशाला रेल्वेच्या कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षाही केली जाईल, असा इशाराही रेल्वेने दिला आहे. 

दंडाच्या रकमेत वाढ केल्यास बसेल चाप रेल्वेत दररोज हजारो प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. या प्रवाशांकडून रेल्वेने १ कोटी ७८ लाखांचा दंड वसूल केला. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी वेळोवेळी रेल्वेकडून मोहीम राबविली जाते. मात्र, तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होत नाही. रेल्वेच्या मते,  दंडाच्या रकमेत वाढ केल्यास नक्कीच विनातिकिट प्रवास  करणाऱ्या प्रवाशांना चाप बसेल, हे खरे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी