शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तब्बल ३६ ‘ब्लॅकस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:51 IST

अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला.

ठळक मुद्देपहिल्यांदाच सर्वेक्षण : अपघातप्रवण स्थळांचा शोध

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला. या निर्णयानुसार वर्धा जिल्ह्यातील तीन वर्षातील अपघातांचा सर्व्हे करून अपघात प्रवणस्थळ निवडण्यात आले. वर्धा जिल्ह्यात थोडीथोडकी नाही तर तब्बल ३६ ब्लॅकस्पॉट असल्याचा अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला.वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ब्लॅकस्पॉट वर्धा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. दुसºया क्रमांकावर हिंगणघाट तालुका आहे. या तालुक्यातून दोन महामार्ग गेल्याने अपघात प्रवणस्थळांची संख्या अधिक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली. तर तिसºया क्रमांकावर देवळी तालुका असून येथे दोन ठिकाण ब्लॅकस्पॉट म्हणून नोंद करण्यात आली.केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने महामार्गावरील अपघात स्थळांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश परिवहन विभाग (आरटीओ) आणि बांधकाम विभागाला दिले आहे. या सर्वेक्षणानुसार अधिकाधिक अपघात होणाºया ठिकाणी कुठल्या दुरूस्तीमुळे अपघाताची तीव्रता कमी करण्यात येईल, याबाबतचा अहवाल सार्वजिनक बांधकाम विभागाला मागितला. ब्लॅकस्पॉट निवड करण्यात किमान तीन वर्षातील अपघाती मृत्यूची नोंद घेण्याचे सूचविले होते. अपघाती मृत्यूचा सरासरी विचार करून त्याच स्थळांना ब्लॅकस्पॉट घोषित करायचे की नाही हे ठरविण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांचा स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्याठिकाणी झालेली जीवितहानी याचा अभ्यास करून विशेष स्थळे निवडण्यात आले. ही स्थळे निवडल्यानंतर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी काही दुरूस्त्या सुचविण्यात आले आहे. हा अहवाल उपप्रादेशिक परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तसेच तो केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.तीन वर्षांच्या अपघातांवरून अपघातप्रवण स्थळांची निवडजिल्ह्यात बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी बांधकाम विभागाच्यावतीने अपघात प्रवणस्थळ असे फलक लावण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना तीन वर्षातील अपघाताचा विचार करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे अशी ठिकाणे नकाशावर नोंद करण्याच्या उद्देशाने हा सर्व्हे करण्यात आला असावा, असा अंदाज अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.गुगल मॅपवर दर्शविणार ब्लॅकस्पॉटप्रवासादरम्यान बहुतांश चालकांकडून गुगल मॅपचा वापर केला जातो. वाहनामध्ये जिपीआरएस सिस्टीम असल्याने हा मॅप वापरला जातो. आता ब्लॅकस्पॉट रस्त्यावर असल्याची सूचना चालकांना ५०० मिटरपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करून होणारा अपघात टाळणे शक्य आहे. यासाठी ब्लॅकस्पॉट गुगल मॅपला टॅग केले जाणार आहे.अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनाअपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काही उपाययोजना सूचविल्या आहे. त्या उपाययोजना बांधकाम विभागाला पूर्ण करावयाचे आहे. यात सिग्नल बोर्ड, स्पीड ब्रे्रकर, रस्ता दुभाजक, फुटलेले रस्ता दुभाजक पूर्ण करणे यासारख्या उपाययोजना सुचविल्या आहे.महत्त्वाचे १२ ब्लॅकस्पॉट व तीन वर्षात झालेले मोठे अपघातजाम चौरस्ता, समुद्रपूर- १०नंदोरी फाटा, हिंगणघाट - १०आजंती शिवार, हिंगणघाट - १०नांदगाव चौक, हिंगणघाट - १४महाबळा शिवार, सेलू - ०८बरबडी बसस्थानक, सिंदी (रे.)- ०८देवळी नाका, वर्धा - ०४शिवाजी चौक वर्धा - ०६बजाज चौक, वर्धा - ०७जुनापाणी चौक, वर्धा - ०७इसापूर शिवार, देवळी - ०७खर्डा शिवार, देवळी - ०७