शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

३५ वृत्तपत्र वितरकांना मिळाला रेनकोटचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:11 IST

मदत फाऊंडेशनच्यावतीने वृत्तपत्र वितरक मुलांना रेनकोट, प्रत्येक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ठाणेदार चौधरी यांच्या सौजन्याने गणवेश....

मदतचा उपक्रम : २५ विद्यार्थ्यांना गणवेशलोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मदत फाऊंडेशनच्यावतीने वृत्तपत्र वितरक मुलांना रेनकोट, प्रत्येक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ठाणेदार चौधरी यांच्या सौजन्याने गणवेश तथा दिव्यांगांना रिक्षा सायकलकरिता दोन ट्युब व टायर वाटपाचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. स्थानिक गुरूजी मठात रविवारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता मेघे आयुर्वेदिक संस्थानचे डीन डॉ. श्यामसुंदर भुतडा तर अतिथी म्हणून ठाणेदार अशोक चौधरी, ‘सक्षम’ संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नंदभाऊ नरोटे, महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघाचे राज्याध्यक्ष सुनील पाटणकर, मदत धर्मार्थ दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मोहोड, मदतचे अध्यक्ष अनिल जोशी, सचिव प्रा. मोरेश्वर उपाध्यक्ष, डॉ. अनिता भुतडा, लक्ष्मीकांत साखरे आदी उपस्थित होते.मदत फाऊंडेशनने वर्षभरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून राबविलेला आजचा हा कार्यक्रम आहे. समाजात अनेक संस्था काम करतात; पण मदतचे काम आगळेच आहे. समाजातील अत्यंत गरजू घटकांसाठी ते सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. कार्यक्रमाची कल्पकता प्रत्येक वेळी नाविन्यपूर्णच असते, असे सांगितले.प्रास्ताविक मदतचे प्रा. नितीन बोडखे यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांची यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील सर्व वृत्तपत्र घरोघरी वाटणाऱ्या ३५ मुलांना रेनकोट, सर्व शाळांतील २५ गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व ५ रिक्शा सायकल चालह दिव्यांगांना दोन टायर, ट्युबचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन मदतचे निलय जोशी यांनी केले तर आभार दिवाकर भेदरकर यांनी मानले. कार्यक्रमाला श्याम काळे, कैसर अंसारी, विजय अजमिरे, अरुण ढोक, अरुण मानकर, जितेंद्र पाटणी, नितीन ढोबळे, देविदास साठे, प्रणित लोखंडे, अण्णा थूल, अरुण भालेराव, सुनील पारसे, शुभांगी भेदरकर, कविता जोशी, संगिता आपकाजे, गोठाने, डॉ. शुभांगी थोरात, पारसे आदी उपस्थित होते.