शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:07 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारीपासून विशेष मोहीम : कृमीदोष टाळण्यास्तव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना अलंबेडाझॉल नामक जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात २ लाख २१ हजार ५८१ तर शहरी भागात १ लाख २५ हजार १९९ विद्यार्थी आहेत. त्यांना १० फेब्रुवारी रोजी या गोळ्या देण्यात येणार आहेत. निमशासकीय, नगर पालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी आदी ठिकाणी या गोळ्या आरोग्य विभागाच्यावतीने पोहोचविण्यात आल्या आहेत. या गोळ्या १ ते १९ वयोगटातील सर्वच बालकांना देण्यात येणार आहे. त्यापैकी १ ते २ वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर यावरील वयोगटातील बालकांना पूर्ण गोळी देण्यात येणार आहे.मुलांमध्ये वाढत असलेल्या कृमीदोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन व १५ फेब्रुवारीला मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. या दोन दिवसात या गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात ९१६ शासकीय शाळा, ९१ शासकीय अनुदानित शाळा, ९ नगर पालिकेच्या शाळा, १४६ खासगी अनुदानित शाळा, अशा एकूण ११६२ शाळा व १४४१ अंगणवाड्या आहेत. यातील सर्वच बालकांना गोळ्या देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शाळाबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.मोहिमेतून कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वगळलेया मोहिमेतून आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात असलेल्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना वगळल्याने या मोहिमेला भेदभावाचे गालबोट लागले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शासकीय, खासगी अनुदानित व अंगणवाडीतील बालकांना गोळ्या देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आहेत. बालकांसंदर्भात शासन भेदभाव करीत असून या निर्णयामुळे शासनाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे.कृमी दोषामुळे रक्ताशय आणि कुपोषणबालकांमध्ये होणाऱ्या दीर्घकालीन कृमीदोषांमुळे रक्ताशय आणि कूपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बालक कमजोर होतात. शिवाय त्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचा धोका निर्माण होतो. देशात पाच वर्षांखालील मुला-मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण ७० टक्के असल्याचे आढळून आले आहे. शिवाय १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये आणि ३० टक्के मुलांमध्ये रक्ताशय आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्रात हे प्रमाण २९ टक्के असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.