शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भोसा गावात मिळतात ३३ प्रकारचे दाखले घरबसल्या! ई-ग्राम प्रणालीत नागपूर विभागातून अव्वल

By महेश सायखेडे | Updated: April 8, 2023 16:25 IST

या प्रणालीमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प, जमा-खर्च, ग्रामपंचायत भत्ता, दायित्वे, कर आकारणी नोंदवही व इतरही सार्वजनिक कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहे. 

वर्धा : नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, कागदपत्र घरबसल्या मिळावेत यासाठी शासनाने ई-ग्राम प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली राबविण्यात समुद्रपूर तालुक्यातील भोसा ही ग्रामपंचायत नागपूर विभागातून प्रथम ठरली आहे. या प्रणालीद्वारे ३३ प्रकारचे दाखले ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. यामुळे वेळ व पैशाची बचत होणार आहे.

भोसा ग्रामपंचायतीच्या सरपंच पिंकी अंड्रसकर, ग्रामसेवक सचिन डेहनकर व डाटा एन्ट्री ऑपरेटर संदीप करीले यांच्या पुढाकारातून ही प्रणाली या ग्रामपंचायतीत सर्वप्रथम सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प, जमा-खर्च, ग्रामपंचायत भत्ता, दायित्वे, कर आकारणी नोंदवही व इतरही सार्वजनिक कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहे. ग्रामस्थांना १ ते ३३ नमुन्यातील दाखले महा ई-ग्राम ॲपच्या माध्यमातून मोबाईलवरूनही मिळविता येणार आहे.राज्य सरकारच्या तांत्रिक चमूने दिली भेटसंबंधित प्रणाली कशाप्रकारे राबविली जात आहे याची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारच्या तांत्रिक चमूने भोसा ग्रामपंचायतीला भेट देऊन आढावा घेतला. शिवाय ग्रामपंचायत ई-ग्राम प्रणाली योग्य प्रकारे राबवित असल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत मिळेल दाखलेमालमत्ता उताऱ्यासह विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये जावे लागते. या नावीन्यपूर्ण प्रणालीमुळे आता नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या १ ते ३३ सेवा, विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळतील. ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांना माहिती मिळण्यास विलंब होत होता, पण आता ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थिती कालावधीत ग्रामस्थांना वेळीच दाखले उपलब्ध होणार आहेत.

महा ई-ग्राम प्रणाली इतरही सर्व ग्रामपंचायतीत लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. ई-ग्राम प्रणाली भोसा ग्रामपंचायतमध्ये राबविण्यासाठी दाखविलेला उत्साह व घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भोसा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळेच भोसा ग्रामपंचायत ई-ग्राम प्रणालीत नागपूर विभागातून अव्वल ठरली आहे.- रोहन घुगे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा.