शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरात ३२ शिक्षकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:13 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा, देवळी व सेलू तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ३२ शिक्षकांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देशिक्षक समितीचा उपक्रम : १२ वर्षात ५४४ रक्त पिशव्यांचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा, देवळी व सेलू तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ३२ शिक्षकांनी रक्तदान केले. गत १२ वर्षात सदर उपक्रमाच्या माध्यमातून ५४४ रक्तपिशव्या संकलन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.जि.प.च्या सभागृहात पार पडलेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे, विस्तार अधिकारी सुरेश हजारे, सेवाग्राम येथील वैद्यकीय अधिकारी किरण मेहरा, शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीचे निमंत्रित सदस्य विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास खेकारे, जिल्हा कार्याध्यक्ष अजय काकडे, मनोहर डाखोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिरात विस्तार अधिकारी सुरेश हजारे यांच्यासह एकूण ३२ शिक्षकांनी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने कार्य करणाºया देवळी पं.स.अंतर्गत येणाºया दिघी (बो.) शाळेच्या शिक्षिका अर्चना गिरी, सेलू पं.स.तील खापरी शाळेचे शिक्षक संजय देवळीकर, सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले केंद्र प्रमुख रवींद्र राठोड, शिक्षक रवींद्र लवणे, रुपसिंग राठोड तसेच राष्ट्रीय पातळीवर कराटे या क्रीडा स्पर्धेत कास्य पदक पटकाविणाºया आर्या मनीष ठाकरे हिचा मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देहदानाचा संकल्प करणारे कृष्णराव भोयर याचा सत्कार जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेला देशपातळीवर स्वच्छतेसाठीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांचा आणि शालेय स्वच्छता स्पर्धा आयोजित करून त्यासाठी एक लाख रुपयांच्या पारितोषिकांचा निर्णय घेतल्याबद्दल शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट यांनाही सन्मानित करण्यात आले. संचालन रवींद्र पावडे यांनी केले.