शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भंगार विक्रीतून पालिकेची ३.१५ लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:38 IST

भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे

वर्धा : भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅन लाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली नमुद करणाºयाला सदर साहित्य विकण्यात आले असल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले.

या भंगार विक्री प्रक्रियेत पाच इच्छुकांनी भाग घेतला होता. सुनील नारायण लोखंडे आर्वी यांनी ३ लाख १३ हजार, मोसीन स्ट्रील ट्रेडर्स नागपूर ३ लाख ११ हजार, फोर स्टार स्कॅप यवतमाळ ३ लाख ७ हजार तर एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांनी ३ लाख १५ हजाराची बोली नमुद केली होती. सर्वाधिक बोली नमुद केल्याने एच.एन.ए. ट्रेडर्स नागपूर यांना पालिकेच्यावतीने भंगार विक्री करण्यात आले आहे. सदर भंगार विक्रीतून पालिकेला ३ लाख ५ हजारांची मिळकत मिळेल असा अंदाज होता;पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान दहा हजार रुपये जादाचे मिळाले आहे, हे उल्लेखनिय.

सा.बां.विभागाकडून करून घेतले व्हॅल्यूवेशनन.प.च्या मालकीचे असलेले व उपयोगात न येणारे विविध साहित्य भंगारात टाकून विकल्यास त्याची किती रक्कम मिळावयाला पाहिजे याचे व्हॅल्यूवेशन न.प. अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतले. ३ लाख ५ हजार रुपये सदर साहित्याचे मिळेल असा अहवाल सा.बा.विभागाच्या अधिकाºयांनी न.प.ला दिला होता. मात्र, प्रत्यक्ष लिलावादरम्यान न.प.ला १० हजार जास्त प्राप्त झाले आहे.

९० कंटेनरसह विविध साहित्याची विक्रीन.प.च्या कुठल्याही कामात न येणाºया व धुळखात पडून असलेल्या काही साहित्याची वर्धा न.प.ने यंदा विक्री केली आहे. यात मोडके कचºयाचे ९० कंटेनर, २ छोटी कचरा ट्रॉली, ३ पाणी टॅक, २ ट्रॉली व रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेली १ टन वजनाची जुन्या जाळीचा समावेश आहे. 

२००८-०९ मध्ये मिळाले होते लाख रुपयेवर्धा नगर परिषदेने २००८-०९ मध्ये यापूर्वी भंगार विक्री केली होती. त्यावेळी विविध साहित्य विक्रीतून नगर पालिकेला सुमारे १ लाख रुपये प्राप्त झाले होते, असे न.प.अधिकाºयांनी सांगितले.

वाहन विक्रीतून ५.८३ लाखवर्धा न.प.ने भंगार झालेल्या व त्यांच्याकडे धुळखात पडून असलेल्या चार ट्रकसह एक अग्निशमनबंवाची रितसर निविदा बोलावून ५ लाख ६३ हजारात विक्री केली. या लिलाव निविदा प्रक्रियेत एकूण २९ इच्छुक सहभागी झाले होते. सदर भंगार वाहनांचे व्हॅल्यूवेशन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले होते. १ लाख ६३ हजार न.प.ला मिळावे असा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला होता. पण, प्रत्यक्ष लिलावादरम्यान सदर भंगार गाड्यांची ५ लाख ६३ हजारात विक्री झाल्याचे न.प. अधिकाºयांनी सांगितले.