शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

By admin | Updated: May 30, 2014 00:19 IST

जिल्हा परिषदेतील ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चटोपाध्याय) मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी निर्गमित केले. चटोपाध्याय आयोग शिफारशीनुसार एकाच वेतनश्रेणीत

वर्धा : जिल्हा परिषदेतील ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चटोपाध्याय) मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी निर्गमित केले. चटोपाध्याय आयोग शिफारशीनुसार एकाच वेतनश्रेणीत सलग १२ वर्षांच्या सेवेनंतर त्यातील अटींची पुर्तता केलेल्या पात्र शिक्षकांना मिळणारा वरिष्ठ वेतनश्रेणीचा हा लाभ या आदेशान्वये दिला जाणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मंजुरी दिलेल्या आदेशामध्ये ३0२ सहायक शिक्षक, ८ पदविधर शिक्षक, ३ उच्चश्रेणी मुख्याध्यापक व एक केंद्र प्रमुख अशा जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमधील एकूण ३१४ जणांचा समावेश आहे. यात सन २000 मध्ये रूजू झालेल्या शिक्षण सेवकांच्या पहिल्या बॅचमधील १९७ शिक्षकांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर २00९ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांचा शिक्षण सेवकाचा तीन वर्षांंचा कालावधी सलग सेवेमध्ये ग्राह्य धरून ते २0१२ मध्ये पात्र ठरले होते. त्यांना ही वेतनश्रेणी लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने प्रयत्न केले होते. यानंतर वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हा परिषदेमध्ये त्याचा पाठपुरावा करण्यात आला. शिवाय अन्य शिक्षक संघटनांनीही यासाठी प्रयत्न केल्याने सर्व १९७ शिक्षण सेवकांना या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला. या प्रस्तावाची कारवाई तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चóो यांच्या कक्षात ३१ ऑगस्ट २0१३ ला झालेल्या शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्येच मान्य करून सुरू झाली होती.  तेव्हा सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना त्या शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे लेखी निर्देश देण्यात आले होते. ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्याच्या वर्धा जि.प. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)