शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामच्या विकासासाठी ३१ कोटींची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 22:33 IST

महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभुगाव, बरबडी, चितोडा, इंझापूर, सेलूकाटे या गावांचा होणार विकास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींचा सहवास लाभलेल्या सेवाग्राम गावाच्या विकासाकडे शासनाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. सेवाग्राम विकास आराखड्या व्यतिरिक्त सेवाग्राम गावाच्या विकासासाठी ३१ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सुचविल्याप्रमाणे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पायाभूत सुविधा विकास व सौदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.सेवागाम गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २३ कोटी रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आली आहे. सेवाग्राम सोबतच भुगाव, बरबडी, चितोडा, इंझापूर, सेलूकाटे या गावांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर सेवाग्राम गावात ६० लक्ष ४४ हजार रुपयांची पूर सरंक्षणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महात्मा फुले जलभूमी अभियानाअंतर्गत अण्णा सागर तलाव पूनर्भरण व जलसंधारणाची ५ कोटी ५० लाख रुपयांचे काम सुरू आहे. यात ७५ लक्ष ४१ हजार रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. सेवाग्राम मधील मुळ गावठाणाचा विकास करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने सुचविलल्याप्रमाणे आराखड्याअंतर्गत कस्तुरबा चौक ते आश्रमपर्यंत नाली बांधकाम, फुटपाथ, सायकल ट्रॅक, विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्याशिवाय सुद्धा सेवाग्राममध्ये विकास कामे सुरू आहेत. नागरिकांच्या मागणीप्रमाणे गावातील इतर विकास कामे सुद्धा वर्षभरात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम