शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ७५ शेतकऱ्यांचे अडकले १९.८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:55 IST

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत.

ठळक मुद्देचिंता वाढली : दीड महिना लोटूनही तुरीचे चुकारे अप्राप्त

ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. जिल्ह्यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांचे तब्बल १९ कोटी ८२ लाख १८ हजार ९५२.५० रुपयांचे चुकारे थकले आहेत. शेतकऱ्यांकडून जुन्या हंगामातील अपयशाच्या आठवणी विसरून नव्या हंगामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. यात चुकारे थकल्याने त्यांची चांगलीच अडचण होत आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. या सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. यानुसार शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करून तूर आणण्याच्या सूचना होत आहेत. नोंद झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल संदेश पाठवून त्यांचा शेतमाल आणण्याबाबत कळविले जाते. या पद्धतीत आतापर्यंत ५ हजार ७६० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहेत. यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ३६ हजार ३७० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.तुरीची खरेदी झाल्यानंतर किमान आठ दिवसांत त्यांना चुकारे मिळणे अपेक्षित आहे; पण जिल्ह्यात तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. नाफेडला तूर देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या संदर्भात मार्केटींग कार्यालयात विचारणा करण्याकरिता शेतकरी जात असून त्यांना अनुदान येताच चुकारे देण्यात येणार असल्यासचे सांगितले जात आहे; पण अनुदान कधी येणार, याची माहिती त्यांना नसल्याचे दिसून येते. शासनाच्या या अनागोंदीमुळे तूर उत्पादक मात्र आर्थिक अडचणीत आल्याचे दिसत आहे. शासनाने याकडे लक्ष देत शेतकºयांचे तुरीचे थकित चुकारे त्वरित अदा करणे गरजेचे झाले आहे.शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडेशासनाच्या केंद्रावर तूर देऊन वेळीच रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. शासनाला तूर दिल्यास किमान हमीभाव मिळण्याची आशा आहे; पण रकमेकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान सहन करीत व्यापाऱ्यांना तूर देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसते.येत्या दिवसात चण्याची खरेदीशासनाकडून तूर खरेदी सुरू असलेल्या केंद्रांवर तुरीसोबतच चण्याची खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या केंद्रावर चणा खरेदीची तयारी पूर्ण झाली असून त्याचा मुहूर्त लवकरच साधणार असल्याचे मार्केटींग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. चण्याची खरेदीही आॅनलाईन पद्धतीने तुरीच्या निकषानुसार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या शासकीय खरेदीकडे शासनाची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या आॅनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.येत्या चार-पाच दिवसांत चण्याची खरेदी सुरू होणार आहे. शेतकºयांनी केंद्रावर जाऊन आपली आॅनलाईन नोंदणी करण्याची गरज आहे. चणा खरेदीत शेतकऱ्यांकडून शासनाच्या केंद्राला पाठ दाखविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. तुरीचे चुकारे अडले असल्याचे सध्या वास्तव आहे. शेतकऱ्यांना चुकारे देण्याकरिता शासनाकडून लवकरच अनुदान मिळणार असून ते येताच तुरीचे चुकारे देण्यात येणार आहे.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.