वर्धा : विधानसभेत झालेल्या मतदानाची रविवारी मोजणी झाली. यात लोकसभेच्या तुलनेत नोटाचा वापर अधिक झाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील चारही मतदार संघात एकूण ३ हजार ८३७ मतदारांनी नोटाचा वापर केला. हा वापर लोकसभेपेक्षा अधिक ठरला. लोकसभेत २ हजार १९० मतदारांनी नोटाचा वापर केला होता. यंदाच्या निवडणुकीपासून मतदाराला नकाराधिकाराचा अधिकार देण्यात आला. या नकाराधिकाराचा वापर करणे मतदाराने यंदापासून सुरू केले. लोकसभेत झालेल्या या अधिकाराचा वापर विधानसभेत वाढणार असे भाकीत करण्यात आले होते. ते भाकीत खरे ठरत असल्याचे समोर आले आहे. नकाराधिकाराचा सर्वाधिक वापर आर्वी मतदार संघात झाल्याचे समोर आले आहे. येथे एकूण १ हजार २४० मतदारांनी नोटाची बटन दाबली. वर्धेत ९४५, देवळीत ७०१ तर हिंगणघाट येथे ९५१ मतदारांनी नोटाचा वापर केल्याचे समोर आले आहे. विधानसभेत नकाराधिकाराचा वावर वाढल्याने काहींचे गणित बिघडले असे म्हणता येत नसले तरी त्याचा परिणाम उमेदवाराच्या मतांवर पडल्याची चर्चा आहे.
३ हजार ७३१ मतदारांनी केला नोटाचा वापर
By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST