शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

४१४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ३ कोटी ६१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांना अखेर ८ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, बँक खात्यात ३ कोटी ६१ लाख ४८८ रुपये जमा करण्यात आले आहेत. आता सेलू येथील तहसीलदारांच्या सूचनेवरून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या आदेशान्वये सेलू येथील तहसीलदारांनी २०२१ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविली. टालाटुले याचे सिंदी रेल्वे येथील शेत आणि लेआउटचा लिलाव झाला. या लिलावात सरकारला ३ कोटी ६२ लाख रुपये मिळाले आहेत. तहसीलदार, सेलू यांनी बँक ऑफ इंडिया व सहायक निबंधक सहकारी संस्था, सेलू यांना पत्र पाठवून लिलावातून मिळालेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या असून पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

...अन् मोफत चालविला खटला...फसवणूक करणाऱ्या टालाटुले या व्यापाऱ्याविरोधात शेतकऱ्यांना न्यायालयात खटला लढावा लागला. मात्र, शेतकरी आर्थिक अडचणीत आले असल्याने या प्रकरणात ॲड. शंतनू भोयर यांनी शेतकऱ्यांचा हा खटला मोफत लढण्याचा निर्णय घेतला. ४ वर्षे हा खटला लढण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक छदामही त्यांनी घेतला नाही, हे विशेष.

शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह पैसे परत करण्याचा आदेश आहे. त्यामुळे सुनील टालाटुलेकडून वसूल करण्यात येणारी रक्कम ८ कोटींवरून १२ कोटींवर पोहोचली आहे. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. - रामनारायण पाठक, शेतकरी नेते.

 

टॅग्स :Farmerशेतकरी