शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा : ११८ ग्रामपंचायतींच्या २४५ आशा स्वयंसेविकांना मिळाली एचबीएनसी कीट

By महेश सायखेडे | Updated: February 27, 2023 19:08 IST

जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या सूचनांना ग्रामपंचायतींचा प्रतिसाद

वर्धा : बालकांची घरच्या घरी काळजी कशी घ्यावी, याबाबत उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविकांना विशिष्ट वस्तूंची कीट उपलब्ध करून देणे आवश्यक असते. ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर ही कीट उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी केली होती. त्याला चांगला प्रतिसाद देत ११८ ग्रामपंचायतींनी २४५ आशांना ही कीट उपलब्ध करून दिली आहेत. लवकरच सर्वच आशा स्वयंसेविकांना ही कीट उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. ग्रामीण भागामध्ये १ हजार ३३ आशा स्वयंसेविका ही योजना प्रभावीपणे राबवीत आहेत. या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविकांना विविध स्वरूपाच्या आरोग्य विषयक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात एचबीएनसी अर्थात घरच्या घरी बालकांची कशी काळजी घ्यावी, या कार्यक्रमाचा समावेश आहे. आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांच्या घरी जाऊन गृहभेट देणे व भेटीच्या दरम्यान बालकाला पकडण्यापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक, बाळाचे वजन, तापमान घेणे, बाळाला उबदार ठेवण्याच्या पद्धती मातेला समजावून सांगणे, श्वासाची गती मोजणे, आदी कृती आशा स्वयंसेविकांना कार्यक्रम दरम्यान करावयाच्या असतात. त्यादृष्टीने आशा स्वयंसेविकेकडे एचबीएनसी कीट व त्यामध्ये डिजिटल घड्याळ, डिजिटल थर्मामीटर, वजन काटा, नवजात बाळाकरिता छोटे ब्लॅंकेट, फीडिंग चम्मच, साबन, साबणाचा डब्बा हे साहित्य आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावरील उपलब्ध अनुदानातून आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सूचना केल्या होत्या. या सूचनेला चांगला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतीने आपल्या गावातील २४५ आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून दिल्या आहे.

समुद्रपूर तालुका अव्वलसमुद्रपूर तालुक्यातील ७१ पैकी ६५ ग्रामपंचायतींनी ११८ आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून दिली आहे. हिंगणघाट तालुक्यात ७६ पैकी ३६ ग्रामपंचायतींनी ६३ आशांना कीट उपलब्ध करून दिली, तर वर्धा तालुक्यात ७६ पैकी सात ग्रामपंचायतींमधील ४४ आशा स्वयंसेविकांना किट उपलब्ध करून दिली असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंतचा विचार केल्यास एचबीएनसी कीट उपलब्ध करून देण्यात समुद्रपूर तालुका अव्वल असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

बाल मृत्यू रोखण्यासाठी होणार मदतजिल्ह्यातील सर्वच आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कीट उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहे. कीट उपलब्धतेमुळे गावपातळीवर आशा स्वयंसेविकांना आपल्या कार्यक्षेत्रातील नवजात बालकांना आरोग्यविषयक सेवा देण्यास सोयीचे होणार आहे. बाल मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा