शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागात २३४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:18 IST

सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे.

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप : करावे लागते नेहमीच अतिरिक्त काम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार वर्धा पाटबंधारे विभागात उप कार्यकारी अभियंत्यांचे एक पद मंजूर असून ते गत अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तर कनिष्ठ अभि./शाखा अभि. /स.अ.श्रेणी-२ चे दोन पदे रिक्त आहेत. आरेखकचे एक, सहा. आरेखकचे एक, वरिष्ठ लिपीकाचे एक, कनिष्ठ लिपीकाचे दोन, टंकलेखकाचे एक, अनुरेखकाचे दोन, स्था. अभियांत्रिकी सहा.चे १२, वाहन चालकाचे तीन, नाईकचे एक, शिपाईचे १६, चौकीदाराची दोन पदे रिक्त आहेत. इतकेच नव्हे तर दप्तर कारकुणची १७, कालवे निरीक्षकाची ७९, मोजणीदारची ४२, संदेशकची ११, कालवे चौकीदारची ३१, कालवे टपलीची नऊ पदे रिक्त आहेत. वर्धा पाटबंधारे विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ३३५ पदे मंजूर असली तरी सध्यास्थिती या विभागात केवळ १०१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अल्प मनुष्यबळामुळे विविध कामे प्रभावित होत असल्याने सदर विभागात पुरेसे मनुष्यबळ कार्यरत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचा अपव्यय रोखणे ठरतेय कठीणकालवे निरीक्षकांची ८८ पदे मंजुर असताना सध्या केवळ नऊच कर्मचारी सदर पदावर कार्यरत असल्याचे वास्तव आहे. प्रकल्पातील पाणी सोडल्यावर कुठला कालवा फटला तर नाही ना तसेच कुठे पाण्याचा अपव्यय तर होत नाही ना याची शहानिशा हे कर्मचारी करतात. परंतु, अल्पमनुष्यबळामुळे सध्या होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनेक अडचणींचा सामनाच वर्धा पाटबंधारे विभागाला करावा लागत आहे.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकालवे चौकीदार महत्त्वाचे ठरतात. परंतु, सध्यास्थितीत ३३ पैकी ३१ कालवे चौकीदारांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाठपुराव्याकडे दुर्लक्षच?वर्धा पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. तेथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत व्हावे यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे; पण संबंधित अधिकारी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच करीत असल्याने कार्यरत कर्मचाºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प