लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सततच्या पावसामुळे सोसाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पडल्याचे चित्र बघवयास मिळत आहे. तर सध्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. असे असले तरी यंदा कपाशीचे समाधानकारक उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असून आतापर्यंत २२ हजार १७५ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे.दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. एकरी किमान तीन पोते तरी सोयाबीन होईल काय, हा प्रश्न सध्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहेत. तर सिंचनाची सोय असलेले काही शेतकरी रबी हंगामात चणा किंवा गहू यापैकी कुठले पीक घ्यावे, याबाबत विचार करीत आहेत. तर सध्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशाही परिस्थितीत पांढरे सोने अशी ओळख असलेले कापूस हे पीक दगा देणार नाही, अशी आशा कापूस उत्पादकांना असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार १७५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी केली आहे.पणन महासंघाकडून नोंदणी सुरू नाहीचकापूस पणन महासंघाने जिल्ह्यात अजूनही कापूस खरेदीसाठीची नोंदणी सुरू केलेली नाही. असे असले तरी मागील वर्षी ५ हजार ५५० ते ५ हजार ३५० दराने चार केंद्रांवरून १० हजार ४४ शेतकऱ्यांचा २ लाख ३७ हजार ६९६ क्विंटल कापूस खरेदी केला होता. असे असले तरी वरिष्ठांच्या सूचना आल्यावर कापूस पणन महासंघाकडून जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कापूस उत्पादक शेतकरी कपाशीवर आलेल्या बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या प्रयत्न करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.
२२,१७५ कापूस उत्पादकांनी केली सीसीआयकडे नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST
दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. एकरी किमान तीन पोते तरी सोयाबीन होईल काय, हा प्रश्न सध्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहेत. तर सिंचनाची सोय असलेले काही शेतकरी रबी हंगामात चणा किंवा गहू यापैकी कुठले पीक घ्यावे, याबाबत विचार करीत आहेत. तर सध्या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
२२,१७५ कापूस उत्पादकांनी केली सीसीआयकडे नोंदणी
ठळक मुद्देकपाशीवर बोंडअळी तरी समाधानकारक उत्पन्नाची आशा