शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

आजाराने जर्जर 2,200 व्यक्तींना मिळणार घरपाेच कोविड व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विविध आजारांमुळे साधे लसीकरण केंद्रांपर्यंतही न जाऊ शकत असलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने गोळा केली. माहिती गोळा करताना हिंगणघाट तालुक्यात ४५०, सेलू २०५, आर्वी ८७, आष्टी १४६, वर्धा ७०८, देवळी १८४, समुद्रपूर २२५ तर कारंजा तालुक्यात २०० लाभार्थींना घरपोच लस द्यावी लागेल, असे निदर्शनास आले आहे. 

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा आराखडा तयार : लससाठ्याची नोंदविली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध आजारांनी जर्जर झाल्यामुळे साधे लसीकरण केंद्रांवरही जाता येत नसलेल्या व्यक्तींना घरपोच कोविडची व्हॅक्सिन देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी जिल्हा आरोग्य विभागाने पूर्ण केली असून, लससाठ्याची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. लससाठा उपलब्ध होताच, जिल्ह्यात आजारांनी जर्जर झालेल्या २,२०० व्यक्तींना घरपोच लस दिली जाणार आहे. शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विविध आजारांमुळे साधे लसीकरण केंद्रांपर्यंतही न जाऊ शकत असलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने गोळा केली. माहिती गोळा करताना हिंगणघाट तालुक्यात ४५०, सेलू २०५, आर्वी ८७, आष्टी १४६, वर्धा ७०८, देवळी १८४, समुद्रपूर २२५ तर कारंजा तालुक्यात २०० लाभार्थींना घरपोच लस द्यावी लागेल, असे निदर्शनास आले आहे. 

मला लस कधी मिळणार?

अर्धांगवायूच्या झटक्यामुळे मी सध्या घरी खाटेवरच आहे. साधे लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची लस घेऊ शकत नाही. शासनाचे धोरण उत्तम असून, लवकर त्यावर कृती व्हायला पाहिजे. आपण घरपोच मिळणारी कोविडची व्हॅक्सिन नक्कीच घेऊ.- कल्पना तेलंग, कृष्णनगर, वर्धा. 

शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून घरपोच किती लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागेल, याची माहिती गोळा करण्यात आली. जिल्ह्यात २ हजार २०० व्यक्तींना घरपोच लस द्यावी लागणार आहे. तशी माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आली आहे. सूचना मिळताच, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यात येईल.- डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, वर्धा. 

हायरिस्कमध्ये कोण?

- विविध आजारांमुळे जर्जर झालेल्या, तसेच साधे लसीकरण केंद्रापर्यंतही जाता येत नसलेल्या व्यक्तींना शासनाच्या या धोरणानुसार हायरिस्कमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

घेतली जातेय अधिकची माहिती- घरपोच २ हजार २०० लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी जिल्ह्यात नमक्या किती लाभार्थ्यांना घरपोच लस द्यावी लागेल याची अधिकची माहिती नव्याने गोळा केली जात आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस