शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत

By admin | Updated: February 20, 2017 01:15 IST

पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे.

करवसुली मोहिमेत ४१ ग्रा.पं. सहभागी : गटविकास अधिकाऱ्यांचाही पुढाकारआष्टी (शहीद) : पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे. यात जागेच्या क्षेत्रफळानुसार घर कर व वापरानुसार पाणी कर आकारला जातो. या करापोटी तालुक्यात २२ लाख रुपये थकित आहेत. मार्च अखेरपर्यंत वसुली व्हावी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी ४१ ग्रामपंचायतींना पत्र देत त्वरित कराची वसुली करा, असे निर्देश दिलेत. थकित कर वसुली झाल्यास प्रलंबित समस्यांवर खर्च करता येणार आहे. यामुळे सर्व ग्रामसेवक करवसुली मोहीम राबवित आहेत.आष्टी तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती आहेत. आष्टी नगर पंचायत झाल्याने येथील करवसुली यंत्रणा स्वतंत्र आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कराचा भरणा करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी घरमालकांना वसुलीबाबत नोटीस बजावल्या आहेत. ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामसेवक मिळून वसुलीला फिरतात. काही ठिकाणी वसुली मिळते तर काही ठिकाणी शेतमाल विकायचा आहे, कुणाची आर्थिक परिस्थिती नाही, यामुळे नंतर कराचा भरणा करू, अशी उत्तरे मिळत आहे. यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते.ग्रामपंचायतकडून सार्वजनिक नाल्या उपसणे, विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकणे, लाईट बसविणे या प्रमुख कामांसह देखभाल दुरूस्तीसाठी प्रयत्न होताना दिसून येतात. पाणीपट्टी वसूल करून विजेच्या बिलाचा भरणा करावा लागतो. कराची वसुली कमी झाली वा झालीच नाही तर बिल कसे भरावे, असा प्रश्न ग्रामसेवकांसमोर उभा ठाकला आहे. सततचा तणाव, नागरिकांच्या तक्रारी यातून कधी मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. शासनाने ग्रामपंचायतला अधिकचे अधिकार प्रदान केले आहेत. यामुळे ग्रामविकास हे उदीष्ट समोर ठेवून सर्वंकष विकासावर भर देणे सुरू केले आहे. आष्टी तालुक्यातील कर मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पंचायत स्तरावर वारंवार आढावा घेतला जात आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन्ही वर्षांची वसुली ६० टक्के झाली आहे. उर्वरित ४० टक्के वसुलीमधील २५ टक्के वसुली मार्च अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधींनी वरचेवर कराचा भरणा केल्याचे दिसून येते. विविध प्रमाणपत्र देण्यापूर्वी करवसुली केली काय, ही अट असल्याने वसुलीस हातभार लागत असल्याचे दिसते. तालुक्यातील साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, तळेगाव, या मोठ्या गावांसह सर्व गावांत करवसुली मोहीम धडाक्याने सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)ग्रामविकासाला चालना देण्याचे प्रयत्नशासनाकडून गामपंचायत प्रशासनाला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामविकासाला चालना मिळावी, हा या मागील हेतू आहे. आता हा हेतू साध्य करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवकांना झटावे लागणार आहे. ग्रा.पं. ला मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास साधावा लागतो. यामुळे सध्या तालुक्यात घर आणि पाणी कर वसुलीवर भर दिला जात आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी करवसुली पूर्ण झाल्यास हातभार लागेल. नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी घरोघरी भेटी देवून कर वसुली मोहीम राबविण्याचे निर्देश ग्रामसेवकांना दिले आहे.- ए.बी. मरबड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).